Devendra Fadnavis made it clear
महाराष्ट्र राजकारण

महाविकास आघाडीतील असंतोष हे त्यांच्या पराभवाचे कारण – देवेंद्र फडणवीस

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात परिवर्तनाची नांदी म्हणजे भाजपचा विजय असून महाविकास आघाडीतील असंतोष हे त्यांच्या पराभवाचे कारण आहे. राज्यात लोकाभिमुख सरकार आणेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस विधान परिषदेच्या विजयानंतर म्हणाले. फडणवीस म्हणाले कि, “राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते घेतली होती. आता विधान परिषद निवडणुकीत […]

Prime Minister Narendra Modi
देश

अनेक निर्णय अयोग्य वाटतात, परंतु राष्ट्र उभारणीत मदत करतात – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बेंगळुरू : अग्निपथ संरक्षण भरती योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये संताप सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले की अनेक निर्णय सुरुवातीला अयोग्य वाटू शकतात, परंतु नंतर राष्ट्राच्या उभारणीत मदत करतात. “सध्या अनेक निर्णय अन्यायकारक दिसत आहेत. कालांतराने, ते निर्णय देशाच्या उभारणीत मदत करतील,” असे पंतप्रधान मोदी यांनी बेंगळुरू येथे जाहीर भाषणात सांगितले. तथापि, पंतप्रधानांनी […]

15 tourists stranded mid-air as cable car in Himachal develops glitch
देश

हिमाचलमध्ये केबल कारमध्ये बिघाड झाल्याने 11 पर्यटक हवेतच अडकले, सर्वांना वाचवण्यात यश

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील सोलन खोऱ्यातील टिंबर ट्रेल परवानू येथे सोमवारी त्यांच्या दोन केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ११ पर्यटक हवेतच अडकून पडले होते. त्यानंतर काही क्षणापुर्वी या सर्वांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव उपकरणाच्या साहाय्याने प्रवाशांना खाली दरीत एका टेकडीवर उतरवले जात होते. पर्यटकांना वाचवण्यासाठी दुसरी केबल कार ट्रॉली तैनात करण्यात आली. टिंबर […]

supreme court
महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा मतदान करण्यास नकार

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता आले नाही. सध्याच्या तरतुदीनुसार तुरुंगातील व्यक्ती मतदान करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. लोकप्रतिनिधींना सूट देण्यासाठी याचिकेत उपस्थित केलेल्या कायदेशीर मुद्द्यांचा नंतर विचार केला जाईल. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर […]

Nine members of a family found dead in Sangli
महाराष्ट्र

सांगली हादरली! एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्या केल्याची माहिती

सांगली : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील नऊ सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले. सुरुवातीला या सगळ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, हे कुटुंब आर्थिक कारणांमुळे तणावत होते. त्यामुळेच या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे हा भयंकर प्रकार घडला आहे. मिरज येथील शासकीय रुग्णालयात या सर्वांचे […]

Washington DC Shooting: Multiple People Including Police Shot at Near Site of Juneteenth Music Concert
ग्लोबल

ब्रेकिंग! वॉशिंग्टन डीसीमध्ये पोलिस अधिकाऱ्यासह अनेक लोकांवर गोळीबार, 16 वर्षीय मुलीचा मृत्यू तर अनेकजण जखमी

वॉशिंग्टन : वॉशिंग्टन डीसीमध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी पोलिस अधिकाऱ्याच्या पायात गोळी लागली आहे. कथितरित्या गोळीबार जुनटीन्थ म्युझिक कॉन्सर्टच्या ठिकाणी घडला आणि संशयिताचा शोध सुरू आहे. गोळीबारात जखमी झालेल्या 3 जणांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले […]

Union Minister for Women and Child Development Smriti Irani infected with corona
देश राजकारण

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी सांगितले की त्यांनी कोविड चाचणी केली असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्मृती इराणी यांनी एका ट्विटमध्ये ही घोषणा केली, जिथे 23 जून रोजी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानापूर्वी भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल त्यांनी दिल्लीच्या राजेंद्र नगरमधील रहिवाशांची माफी मागितली. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली […]

क्राईम देश

धक्कादायक! 24 वर्षीय महिलेवर 15 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून हॉटेलच्या महिला प्रसाधनगृहात बलात्कार

देहराडून : देहराडूनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर हॉटेलमध्ये १५ वर्षीय मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना १७ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार पंचतारांकित हॉटेलच्या महिला प्रसाधनगृहात घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पश्चिम बंगालची आहे. ती विवाहित असून तिला एक […]

Delhi-Bound SpiceJet Flight Returns to Patna as Engine Catches Fire After Takeoff
देश

ब्रेकिंग! स्पाइसजेट विमानाच्या इंजिनला उड्डाणानंतर लागली आग, इमर्जन्सी लँडिंग, सर्व 185 प्रवासी सुरक्षित

पाटणा : पाटण्यात स्पाइसजेटच्या विमानाचा भीषण अपघात थोडक्यात टळला. पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या प्रवासी विमानाच्या इंजिनला अचानक आग लागली, त्यामुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने रविवारी पाटणाहून दिल्लीला उड्डाण घेतल्यानंतर लगेचच आग लागली. SG723 फ्लाइट उड्डाणानंतर लगेचच सुरक्षितपणे लॅन्ड करण्यात आली. विमानातील सर्व 185 प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. […]

Throw that won India Gold Medal watch Neeraj Chopra javelin throw
क्रीडा

अभिमानास्पद! नीरज चोप्राने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवून मोसमातील पहिले सुवर्णपदक जिंकले

Kuortane Games : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची मान उंचावणारा अ‍ॅथलीट नीरज चोप्राची चमकदार कामगिरी सुरूच आहे. शनिवारी रात्री ऑलिम्पिकनंतर त्याने पहिले सुवर्णपदक जिंकले. भालाफेकपटू नीरज चोप्राने फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याने 86.69 मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले आणि सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटर थ्रो केला होता. त्याचा दुसरा […]