मुंबई : सोमालियात मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलप्रमाणेच सोमालियाची राजधानी मोदादिशू येथील हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी आधी हॉटेलबाहेर स्फोट केला, त्यानंतर गोळीबार करत ते हॉटेलमध्ये घुसले. या हल्ल्यात आतापर्यंत १5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल 14 तासांनंतरही सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मोठी बातमी! मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, बेस्ट बसमध्ये मिळणार मोठी सवलत
मुंबई : मुंबईतील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना आता बसमधून प्रवास करण्यासाठी कमी भाडे मोजावे लागणार आहे. ही सुविधा फक्त मुंबईतील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. 22 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. मुंबईतील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बसमधून प्रवास करण्यात सवलत मिळणार […]
पुण्यातील ‘बंटी-बबली’ पोलिसांच्या ताब्यात, घरकाम करण्याच्या बहाण्याने चोरी केलेले 254.6 ग्रॅम सोने जप्त
पुणे : घरकाम करण्याच्या बहाण्याने घरफोडी चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 254.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या गुन्हयात अटक केलेली महिला लोकांच्या घरी घरकाम करण्याचा बहाणा करुन एक-एक सोन्याचा दागिना चोरी करत असायची. तसेच अटक केलेला पुरुष चोरी केलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवत असल्याचे तपासात निष्पन्न […]
त्रिपुरामध्ये बांग्लादेश सीमेजवळ झालेल्या चकमकीत बीएसएफ जवान शहीद
त्रिपुरा : शुक्रवारी उत्तर त्रिपुराच्या कांचनपूर उपविभागातील भारत-बांग्लादेश सीमेवर संशयित NLFT अतिरेक्यांसोबत झालेल्या भीषण चकमकीत एक बीएसएफ जवान शहीद झाला. बीएसएफच्या 145 बटालियनचा ग्रिजेश कुमार असे या जवानाचे नाव असून, गोळीबारात त्याला चार गोळ्या लागल्या आहेत. कांचनपूर उपविभागातील सिमा-2 सीमा चौकी परिसरात बीएसएफचे एक पथक क्षेत्र वर्चस्व अभियानावर होते, यावेळी अतिरेक्यांच्या बाजूने गोळीबार सुरू झाला. […]
ब्रेकिंग! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे गया येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री निघाले होते. दरम्यान, खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. Bihar CM Nitish Kumar’s helicopter makes an emergency landing in Gaya due to bad weather conditions. CM went out […]
दोन्ही वैमानिक झोपी गेल्यामुळे विमानाचे लँडिंग चुकले, विमान 37,000 फूट उंचीवर होते आणि….
इथिओपिया : विमानातील दोन्ही वैमानिक झोपी गेल्यामुळे इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाचे लँडिंग चुकले. सोमवारी (१५ ऑगस्ट) हे विमान सुदानच्या खार्तूमहून इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाकडे जात असताना ही घटना घडली. एव्हिएशन हेराल्डनुसार, जेव्हा विमान विमानतळाजवळ आले तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ने अलर्ट जारी केला, परंतु विमानाने लँडिंग केलेच नाही. विमान ऑटोपायलट मोडमध्ये होते आणि त्यामुळे विमान […]
40.95 कोटी कोटींच्या बनावट बिल घोटाळाप्रकरणी बोरीवली, विलेपार्ले येथील व्यापाऱ्याला अटक
मुंबई : 40.95 कोटी रुपयांच्या बनावट देयकांच्या माध्यमातून बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (आय.टी.सी) वितरित करुन शासनाच्या 7.37 कोटी रुपयांच्या कर महसूलाची हानी केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाई करुन अटक केली. अतुल नामदेव अहिरे, अहिरे एंटरप्राईज असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, […]
डबलडेकर इलेक्ट्रिक वातानुकूलित बस व प्रीमियम बससेवेचे लोकार्पण
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या बेस्टला अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांच्या मागण्यासंदर्भातील आवश्यक तो निधी लवकरच वितरित करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम) उपक्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून डबलडेकर इलेक्ट्रिक […]
दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून सन २०२१ व २०२२ या वर्षांसाठी दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे. अर्ज, नामांकने www.awards.gov.in या संकेतस्थळावरुन भरण्याचे आवाहन दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार २०२१ व […]
मुंबई : बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली, पहा व्हिडीओ
मुंबई : मुंबईतील बोरिवली येथे एक चार मजली इमारत कोसळली आहे. बोरिवली पश्चिमेतील साईबाबा नगरमध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, बचाव आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये काहीजण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन रेस्क्यू व्हॅन आणि तीन ऍम्ब्युलन्स आधीच घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बोरिवली परिसरातील […]










