Maharashtra Goods and Service Tax Department
महाराष्ट्र मुंबई

40.95 कोटी कोटींच्या बनावट बिल घोटाळाप्रकरणी बोरीवली, विलेपार्ले येथील व्यापाऱ्याला अटक

मुंबई : 40.95 कोटी रुपयांच्या बनावट देयकांच्या माध्यमातून बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (आय.टी.सी) वितरित करुन शासनाच्या 7.37 कोटी रुपयांच्या कर महसूलाची हानी केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाई करुन अटक केली. अतुल नामदेव अहिरे, अहिरे एंटरप्राईज असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ यांनी दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मे. अहिरे एंटरप्राईजच्या बोरीवली, विलेपार्ले येथील व्यावसायिक ठिकाणी पथकाने भेटी दिल्या. 40.95 कोटी रुपयांच्या बनावट देयके वितरित करुन त्याद्वारे 7.37 कोटींचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (आय.टी.सी) वितरित केले. तसेच 8.21 कोटी रुपयांच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला. दरम्यान 5 ऑगस्ट रोजी शहा एंटरप्राईजेसच्या मालकाला करचुकवेगिरीप्रकरणी अटक करण्यात आली होती तर, मे. एस. के. स्टार या आस्थापनाच्या व्यापाऱ्याला देखील काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने अटक केली होती.

राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ, मुंबई व संजय सावंत, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त नंदकुमार दिघे व आनंद गवळी यांनी ही मोहिम राबवली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत