BSF jawan killed in gunbattle with militants near Bangladesh border in Tripura
देश

त्रिपुरामध्ये बांग्लादेश सीमेजवळ झालेल्या चकमकीत बीएसएफ जवान शहीद

त्रिपुरा : शुक्रवारी उत्तर त्रिपुराच्या कांचनपूर उपविभागातील भारत-बांग्लादेश सीमेवर संशयित NLFT अतिरेक्यांसोबत झालेल्या भीषण चकमकीत एक बीएसएफ जवान शहीद झाला. बीएसएफच्या 145 बटालियनचा ग्रिजेश कुमार असे या जवानाचे नाव असून, गोळीबारात त्याला चार गोळ्या लागल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कांचनपूर उपविभागातील सिमा-2 सीमा चौकी परिसरात बीएसएफचे एक पथक क्षेत्र वर्चस्व अभियानावर होते, यावेळी अतिरेक्यांच्या बाजूने गोळीबार सुरू झाला. बांग्लादेशातील रंगमाटी हिल जिल्ह्यातील जुपुई भागातून सशस्त्र अतिरेक्यांच्या गटाने बीएसएफ जवानांवर जोरदार गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंमध्ये भीषण चकमक झाली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत