IND vs AUS 3rd T20 : Australia gave India a target of 187
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे आव्हान, मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना…

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाने भारताला 187 धावांचे लक्ष्य दिले आहे. ग्रीन आणि डेव्हिड यांनी अर्धशतक केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आज हैदराबादमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात आमनेसामने आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला, ऋषभ पंतला आज संधी मिळाली नाही, तर भुवनेश्वर […]

Devendra Fadnavis
अमरावती महाराष्ट्र

जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेबाबत चोवीस तासांत अहवाल सादर करा, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रातील आगीच्या घटनेबाबत २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रूग्णालयातील शिशु दक्षता केंद्रात व्हेंटिलेटर मशिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. केंद्रातील १२ […]

prostitute lover comes home drunk boyfriend killed incident in bhiwandi
क्राईम महाराष्ट्र मुंबई

देहव्यापार करणारी प्रेयसी दारू पिऊन घरी आली, प्रियकराने आवळला गळा, आत्महत्येचा बनाव करून मृतदेह परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न पण…

भिवंडी : भिवंडी शहरातील हनुमान टेकडी इथं देह व्यापार करणाऱ्या महिलेची शास्त्री नगर येथील इमारतीत तिच्या सोबत राहणाऱ्या प्रियकराने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, हत्या केल्यानंतर मृतदेह कर्नाटक इथं घेऊन जाताना आरोपीला पुण्यात अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता रामप्पा मादर उर्फ मुस्कान सद्दाम सय्यद (वय 24) असे हत्या झालेल्या महिलेचे […]

Awarded National Service Scheme Award to one program officer and two students from Maharashtra
देश महाराष्ट्र

महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सुशील शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुशील शिंदे हे मुंबईच्या कांदिवली भागातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्‍याच्या […]

NASA Calls Off Artemis I Rocket Launch To Moon On Sept 27 Due To Tropical Storm
ग्लोबल

NASA कडून आर्टेमिस I रॉकेटचे चंद्रावर प्रक्षेपण उष्णकटिबंधीय वादळामुळे रद्द

नासा आर्टेमिस 1 मिशन : NASA ने उष्णकटिबंधीय वादळामुळे 27 सप्टेंबर रोजी आर्टेमिस I रॉकेटचे चंद्रावर प्रक्षेपण बंद केले. उष्णकटिबंधीय वादळ फ्लोरिडा जवळ येत बळकट होण्याचा अंदाज असल्यामुळे NASA ने चंद्रावर आपल्या ऐतिहासिक uncrewed मिशनचे नियोजित मंगळवारचे प्रक्षेपण रद्द केले आहे, असे एएफपी न्यूज एजन्सीच्या वृत्तात म्हटले आहे.

The body of a person
ठाणे महाराष्ट्र

ठाण्यातील तलावात अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ

ठाणे : ठाणे शहरातील तलावात एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 50 वर्षे असल्याची माहिती मिळाली आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरडीएमसी प्रमुख अविनाश सावंत म्हणाले कि, सकाळी 10 च्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला (आरडीएमसी) एक […]

Chief Minister Eknath Shinde directed to prepare a comprehensive plan for police houses
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर, पहा कोण आहे तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास सव्वा महिन्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री असतील. बहुचर्चित औरंगाबादची जबाबदारी संदीपान भूमरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकरांना […]

Nagpur-Goa Expressway will be like the Samriddhi Highway
नागपूर महाराष्ट्र

समृद्धी महामार्गाप्रमाणे ‘नागपूर -गोवा एक्सप्रेस मार्ग’ होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा -पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिकल कॉरिडॉर ‘विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ ( नरेडको ) या संस्थेमार्फत नागपूर येथील ली […]

Present proposals for reforms related to revenue and land records – Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र मुंबई

महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित सुधारणांचे प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे : जमीन मोजणी, सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार आदी महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित बाबींमध्ये कालानुरूप सुधारणा करत राहणे आवश्यक असून सध्याच्या व्यवस्थेचा कालबद्धरित्या आढावा घेत नव्या सुधारणांचे प्रस्ताव सादर करावेत, असे असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाची आढावा बैठक मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. […]

Review of Stamp Department by Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र मुंबई

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मुद्रांक विभागाचा आढावा, नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण करण्याचे आदेश…

पुणे : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नोंदणी व मुद्रांक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासंदर्भात गतीने कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, सह नोंदणी महानिरीक्षक ज्ञानेश्वर खिलारी, नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, सुहास […]