Review of Stamp Department by Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र मुंबई

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मुद्रांक विभागाचा आढावा, नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण करण्याचे आदेश…

पुणे : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नोंदणी व मुद्रांक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासंदर्भात गतीने कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, सह नोंदणी महानिरीक्षक ज्ञानेश्वर खिलारी, नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, सुहास मापारी आदी उपस्थित होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यावेळी श्री. हर्डीकर यांनी विभागामार्फत सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. रजिस्ट्रेशन ऍक्ट १९०८ मधील सुधारणा करण्याबाबतच्या प्रस्ताव, मुंबई मुद्रांक अधिनियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव, नोंदणी विभागांतर्गत माहिती व तंत्रज्ञानामार्फत सुरू असलेले नवीन उपक्रमाची सदारीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

महसूल विभागातील इतर सर्व कार्यालये, तहसिल कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरण करण्यासाठीच्या उपाययोजना याबाबतही आढावा घेण्यात आला. यावेळी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील सर्व कार्यासन अधिकारी उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत