The body of a person

ठाण्यातील तलावात अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ

ठाणे महाराष्ट्र

ठाणे : ठाणे शहरातील तलावात एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 50 वर्षे असल्याची माहिती मिळाली आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरडीएमसी प्रमुख अविनाश सावंत म्हणाले कि, सकाळी 10 च्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला (आरडीएमसी) एक फोन आला आणि या मृतदेहाविषयी माहिती दिली. त्यानंतर नौपाडा पोलीस स्टेशन तसेच आरडीएमसीचे अग्निशमन दल आणि कर्मचारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला. मखमली तलाव येथे मृतदेह सापडला, असे त्यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत