Chief Minister Eknath Shinde directed to prepare a comprehensive plan for police houses
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर, पहा कोण आहे तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास सव्वा महिन्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री असतील. बहुचर्चित औरंगाबादची जबाबदारी संदीपान भूमरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकरांना मुंबई शहर, मंगलप्रभात लोढांना मुंबई उपनगर, शंभुराज देसाईंना ठाणे, संदिपान भुमरेंना औरंगाबादची जबाबदारी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूरसह सहा जिल्ह्यांची धुरा आहे. फडणवीसांना नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या अशा विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

  1. देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली
  2. राधाकृष्ण विखे पाटील : नगर, सोलापूर,
  3. सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया,
  4. चंद्रकांत दादा पाटील – पुणे,
  5. विजयकुमार गावित – नंदुरबार,
  6. गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड,
  7. गुलाबराव पाटील – बुलडाणा,
  8. दादा भुसे – नाशिक,
  9. संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,
  10. सुरेश खाडे – सांगली,
  11. संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
  12. उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
  13. तानाजी सावंत -परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
  14. रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
  15. अब्दुल सत्तार – हिंगोली,
  16. दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर,
  17. अतुल सावे – जालना, बीड,
  18. शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
  19. मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत