पुणे : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. आज रात्री नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. कंटेनरने धडक दिल्यामुळे 48 गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली आहे. अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार नवले ब्रिजवर नर्हे नजीकच्या परिसरात हा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
धक्कादायक! रत्नागिरीत तळवट धरणाच्या दरवाज्याचे अज्ञाताने कुलूप तोडलं, पाण्याचा मोठा लोंढा बाहेर पडल, लाखो लीटर पाणी वाया
रत्नागिरी: खेड तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याने सध्या धरणातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता पाटबांधारे विभाग खडबडून जागा झाला असुन यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या या धरणाच्या दरवाजे उडघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते […]
धक्कादायक माहिती समोर! ऑटोमधील स्फोट दहशतवादी कृत्य, केंद्रीय यंत्रणांसह कर्नाटक पोलीसाकडून तपास सुरू – पोलीस महासंचालक प्रवीण सूद
कर्नाटक : मंगळुरूमध्ये एका ऑटोमध्ये स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धावत्या ऑटोमध्ये झालेला स्फोट अपघात नसून दहशतवादी कृत्य असल्याचं कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी सांगितले आहे. शनिवारी एका धावत्या ऑटोत स्फोट होऊन आग लागली होती. या दुर्घटनेत चालकासह प्रवाशी गंभीररित्या भाजले आहेत. पोलीस महासंचालक प्रवीण सूद म्हटले […]
मोठी बातमी! रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांची आत्महत्या, घरात मृतदेह आढळल्यानंतर खळबळ
दिल्ली : रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अमित जैन यांच्यावर बँकेच्या कर्जाचा भार होता अशी माहिती मिळत आहे. गाजियाबादमधील कौशांबी येथील स्थित ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांचा शनिवारी त्यांच्या निवासस्थानी मृतदेह आढळला. पोलिसांच्या माहितीनुसार, […]
रस्ता ओलांडणाऱ्या चिमुकलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार ६ वेळा पलटली; १ ठार, ८ जखमी
डोळासणे : रस्ता ओलांडत असलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात पुणे-नाशिक माहामार्गवरील डोळासणे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार पलटली. या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर हा अपघात झाला आहे. विजय शंकर डेरे (वय ६२, रा. […]
उत्तराखंडमध्ये कार खोल दरीत कोसळून 12 प्रवाशांचा मृत्यू, ओव्हरलोडमुळे घडला भयंकर अपघात
उत्तराखंड : उत्तराखंडमधील चमोली येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली एक कार सुमारे सातशे मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. मृतांमध्ये 10 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. एसयूव्ही उत्तराखंडमधील जोशीमठ येथून पल्ला जाखुला गावाकडे जात होती. या कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसलेले होते. […]
महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन म्हणजेच न्याय मिळविण्यासाठीची पहिली पायरी
मुंबई : कायदेविषयक मार्गदर्शन करणे म्हणजेच महिलांना न्याय मिळवण्यासाठी सहाय्य करण्याची पहिली पायरी असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. सह्याद्री अतिथीगृह येथे कायदेविषयक विनामूल्य सल्ला देणारे केंद्र (Legal Aid Clinic) शुभारंभ कार्यक्रमात उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील लीगल एड क्लिनिकचे लोकार्पण झाले. यावेळी महिला […]
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर वापरावर बंदी
मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर, हॅण्ड ग्लायडर हॉट एअर बलून यांच्या वापराबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. दि. 12 डिसेंबर 2022 पर्यंत हे लागू असल्याचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी कळविले आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व […]
जिल्हा वार्षिक योजनेचा 100 टक्के निधी विहित वेळेत खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी व सर्व समाज घटकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे सर्व विभागांनी कामे प्रस्तावित करावीत. नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी विहित वेळेत व 100 टक्के खर्च करा, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन […]
महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2022 ची 8.90 टक्के दराने परतफेड
मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.90 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 19 डिसेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय दि.14 डिसेंबर 2012 अनुसार 8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 18 डिसेंबर 2022 पर्यंत देय असलेल्या […]










