Mangaluru Autorickshaw Blast

धक्कादायक माहिती समोर! ऑटोमधील स्फोट दहशतवादी कृत्य, केंद्रीय यंत्रणांसह कर्नाटक पोलीसाकडून तपास सुरू – पोलीस महासंचालक प्रवीण सूद

क्राईम देश

कर्नाटक : मंगळुरूमध्ये एका ऑटोमध्ये स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धावत्या ऑटोमध्ये झालेला स्फोट अपघात नसून दहशतवादी कृत्य असल्याचं कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी सांगितले आहे. शनिवारी एका धावत्या ऑटोत स्फोट होऊन आग लागली होती. या दुर्घटनेत चालकासह प्रवाशी गंभीररित्या भाजले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलीस महासंचालक प्रवीण सूद म्हटले कि, हा स्फोट अपघाती नसून गंभीर नुकसान करण्याच्या उद्देशाने केलेलं दहशतवादी कृत्य होतं, हे आता निश्चित झालं आहे. केंद्रीय यंत्रणांसह कर्नाटक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे तर गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले कि दहशतवादी संघटनांशी संबंधित काही लोकांचा या कृत्यामागे हात असल्याचा आम्हाला संशय आहे. येत्या दोन दिवसांत या कृत्यामागील लोक आणि कारणांचा शोध लागेल.

पोलीस आयुक्त एन. शशी कुमार म्हटले कि, विशेष पथक आणि फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले आहेत. स्फोटाच्या कारणांचा शोध या पथकांकडून घेतला जात आहे या घटनेमुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण असून शहरात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे.

या घटनेविषयी नागरिकांनी अफवा पसरवू नये. त्यांनी शांत राहावं आणि घाबरू नये, असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे. घटनेच्या व्हिडीओमध्ये सुसाट ऑटो रस्त्यावर थांबत असताना हा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या शेजारी या ऑटोनं अचानक पेट घेतला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत