Radisson Blu Hotel Owner Amit Jain Commits Suicide At Delhi Home

मोठी बातमी! रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांची आत्महत्या, घरात मृतदेह आढळल्यानंतर खळबळ

देश

दिल्ली : रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अमित जैन यांच्यावर बँकेच्या कर्जाचा भार होता अशी माहिती मिळत आहे. गाजियाबादमधील कौशांबी येथील स्थित ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांचा शनिवारी त्यांच्या निवासस्थानी मृतदेह आढळला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमित जैन यांचा मुलगा घरी गेला असता त्याला वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळलं. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांना कंट्रोल रुमच्या माध्यमातून आत्महत्येची माहिती मिळाली होती. मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.  पोलिसांनी घातपाताची कोणतीही शक्यता फेटाळली आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमित जैन नोएडामधील आपल्या घरी नाश्ता केल्यानंतर गावातील घरी आले होते. अमित जैन संपूर्ण कुटुंबाला नोएडाला नेणार होते. रस्त्यात त्यांनी आपल्या भावाला गाजियाबादमधील कार्यालयात सोडलं होतं. आपण एकटेच पुढील प्रवास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत