मुंबई : राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू करण्यात आला आहे. आता लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश करण्यात आला आहे, असे बार्टीचे महाव्यवस्थापक धम्मज्योती गजभिये यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीची सेवा देताना सेवा पुरविणारा अधिकारी, कालावधी, प्रथम अपिलीय अधिकारी, द्वितीय […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
डेन्मार्कच्या मदतीने राज्यात ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्प; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची डेन्मार्कच्या राजदूतांशी चर्चा
मुंबई : डेन्मार्कच्या मदतीने राज्यात पुढील वर्षी ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबत आज सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वान यांच्याशी प्राथमिक स्तरावरील चर्चा केली. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वान यांच्याशी विविध प्रकारच्या सहकार्य कराराबाबतही प्राथमिक चर्चा केली. यावेळी डेन्मार्कचे व्यापार आणि उद्योगमंत्री सोरेन कैनिक, उपमंत्री हेन्री […]
पोषक वातावरणामुळे राज्यात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : देशात आणि राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक येण्यासाठी सध्या अतिशय पोषक वातावरण असून महाराष्ट्र राज्यातही इलेक्ट्रॉनिक वाहने, सौर ऊर्जा तसेच पर्यायी ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात वाढ होत आहे. उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही निर्माण करण्यात येत असल्याने महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये गुंतवणूक वाढीसाठी ‘सीए’ समुदाय मोठा वाटा उचलू शकतो […]
नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात अव्वल, मुख्यमंत्र्यांकडून कौतूक
नाशिक जिल्हा समिती पाचव्या स्थानी; अहमदनगर समितीचे दीड महिन्यात ६३४४ जात वैधता प्रमाणपत्र निकाली राज्यात १७ सप्टेंबर २०२२ पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गंत राज्यात ८५८८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने सर्वाधिक ६३४४ प्रकरणे निकाली काढत राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. समितीच्या अधिकारी […]
हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून अभिवादन
मुंबई : हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर,पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस आयुक्त विवेक […]
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, […]
ब्रेकिंग! इंडोनेशियामध्ये 5.6 तीव्रतेचा भूकंप, 20 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक जखमी
इंडोनेशिया : इंडोनेशियातील जकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यात 20 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याचवेळी 300 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सियांजूरच्या प्रशासनाचे प्रमुख हरमन सुहरमन यांनी सांगितले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, केवळ एका रुग्णालयात सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किमान 300 लोकांवर उपचार सुरू आहेत. […]
काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, अनैसर्गिक कृत्य केल्याचाही आरोप
मध्य प्रदेश : धार जिल्ह्यातील आमदार आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने स्वत:ला उमंग सिंगर यांची पत्नी असल्याचे सांगितले आहे. उमंग सिंघार यांनी नोव्हेंबर 2021 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत धार जिल्ह्यातील पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या मागे असलेल्या आमदारांच्या निवासस्थानी […]
पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर काल रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून […]
पुणे : ट्रक 47 वाहनांना धडकल्याने भीषण अपघात, 6 जण रुग्णालयात दाखल, ट्रकचालक फरार
पुणे : नवले पूल परिसरात मुंबई-बंगळुरू बाह्य वळण महामार्गावर चालकाचे उतारावर वेगाने जात असलेल्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने ४7 वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात २० जण जखमी झाले. तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील मालवाहतूक करणारा एक ट्रक रविवारी रात्री साताऱ्याहून […]










