Rape Case Registered Against Former Minister Umang Singhar

काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, अनैसर्गिक कृत्य केल्याचाही आरोप

देश

मध्य प्रदेश : धार जिल्ह्यातील आमदार आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने स्वत:ला उमंग सिंगर यांची पत्नी असल्याचे सांगितले आहे. उमंग सिंघार यांनी नोव्हेंबर 2021 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत धार जिल्ह्यातील पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या मागे असलेल्या आमदारांच्या निवासस्थानी अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच मारहाण करून गैरवर्तन केले आणि अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या सर्व आरोपांच्या आधारे धार पोलिसांनी उमंग सिंघार यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७७ आणि ४९८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही महिला जबलपूरची आहे आणि तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती एका सार्वजनिक कार्यक्रमात उमंग सिंघार यांना भेटली होती. त्यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले. सिंगर यांनी लग्नाचे वचन दिले होते. त्यानंतर ही महिला उमंग सिंघार यांच्यासोबत दिल्ली, गुरुग्राम, धार आणि भोपाळ येथील त्यांच्या घरी राहिली. यादरम्यान सिंघार यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार दिला.

महिलेने याबाबत तक्रार करण्याची धमकी दिल्यावर सिंघार यांनी 16 मार्च 2022 रोजी तिच्या भोपाळ येथील राहत्या घरी तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिचा छळ सुरू केला. सिंघार यांनी अश्लील व्हिडिओ बनवले आणि मित्रांना दाखवण्याचे सांगून ब्लॅकमेल केल्याचा आरोप महिलेने केला आहे. सिंघार यांनी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

गृहमंत्री मिश्रा यांनी केली पुष्टी
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, धार मध्ये एका ३८ वर्षीय विवाहित महिलेने उमंग सिंघार, मध्य प्रदेश सरकारमधील माजी मंत्री आणि आमदार, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि गुजरात निवडणुकीचे सहप्रभारी यांच्याविरुद्ध नौगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेने आरोप केला आहे की नोव्हेंबर 2021 ते 18 नोव्हेंबर 2022 दरम्यान उमंग सिंघार यांनी पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या मागे असलेल्या आमदार निवासात महिलेवर बलात्कार केला आणि तिला मारहाण केली. महिलेने आमदारावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोपही केला आहे. या सर्व आरोपांच्या आधारे नौगाव पोलिसांनी उमंग सिंघार याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७७ आणि ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत