पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) मुलांचा सुरक्षित शालेय प्रवास सुनिश्चित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने, PMC ने त्याच्या विस्तृत शालेय प्रवास सुधारणा योजनेचा भाग म्हणून सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. शाळा, शैक्षणिक संस्था, तांत्रिक तज्ञ आणि नागरी समाज गट यांचा समावेश असलेल्या सहयोगी प्रयत्नातून […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग! दिल्ली एम्स रुग्णालयात आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग, बचावकार्य सुरु
नवी दिल्ली : दिल्ली एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. एन्डोस्कोपी कक्षात आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर […]
उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर आढळला चार फूट लांब नाग…
मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर रविवारी चार फूट लांब नाग आढळला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पाण्याच्या टाकीमागे हा साप आढळून आला. याची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेजस ठाकरे साप पाहण्यासाठी निवासस्थानाबाहेर आले. यानंतर साप पकडणारे पथक घटनास्थळी पोहोचले आणि नागाला […]
बीड हादरले! विधवा महिलेवर चालत्या जीपमध्ये बलात्कार
बीड : एका विधवा महिलेवर दोघांनी चालत्या जीपमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेच्या प्रियकरासमोर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी बीड जिल्ह्यात घडली असून, या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत 26 वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर, ती […]
राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे लोकसभेच्या सचिवालयाकडून सोमवारी पडताळून पाहण्यात आली. त्यानंतर खासदारकीबदद्ल अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व परत मिळण्याची दारे खुली झाली आहेत. मार्च 2023 मध्ये त्यांना स्पीकर ओम बिर्ला यांनी […]
गोंडगाव येथील खटला जलदगती न्यायालयात चालवणार, आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील
जळगाव : गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर […]
राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. स्व. आमदार विनायक निम्हण […]
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम; वर्षभरात बारा हजारांहून अधिक रुग्णांना १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप
मुंबई : साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं…अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली…सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता मिळालेल्या राज्यातील सुमारे १२ हजार ५०० रुग्णांची अशीच प्रतिक्रिया असणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत या वर्षभरात १०० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. हा एक अनोखा […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय! पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी लवकरच संपणार…
पुणे : पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम होणे आता नित्याचे झाले आहे. एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जादा टोल भरूनही नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 2002 मध्ये बांधण्यात आला. या […]
एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी ५० एकर जमीन प्रदान; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
चंद्रपूर : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (एस.एन.डी.टी.) 50 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे शासन निर्णयाची प्रत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे स्वतः सुपूर्द केली. एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल […]










