मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) पतधोरण समितीची बैठक आज १० ऑगस्ट रोजी पार पडली. बैठकीच्या अखेरीस आरबीआयने कर्जदारांना दिलासा देत सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचे जाहीर केले आहे. अशा स्थितीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम राहिला आहे. त्यामुळे कर्जदारांना विशेष दिलासा मिळाला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक ८, ९ आणि १० […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – पणन मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई : शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता असते. डोंगराळ व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतकरी हितासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येणारे भाग भांडवल कर्ज व शासकीय भाग भांडवल याबाबत पणन विभागामार्फत […]
आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू केलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या. […]
विकासप्रकल्प मार्गी लावण्याच्या कामांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : “पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातल्या मार्गिका १, २ आणि ३ ची उर्वरीत कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली जाईल. पुणे रिंगरोडचे काम आता कुठल्याही कारणामुळे रखडणार नाही. पुणे येथील कृषिभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, ‘सारथी’चं प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूर […]
ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन
मुंबई : महात्मा फुले यांच्यावर विपुल लेखन करणारे, लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे. सकाळी मुंबईला […]
लोकप्रिय चित्रपट निर्माते सिद्दिकी यांचे निधन
लोकप्रिय चित्रपट निर्माते सिद्दिकी (63) यांचे 8 ऑगस्ट 2023 रोजी कोची येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काल रात्री ९. १० वाजताच्या सुमारास त्यांचा अमृता रुग्णालयात मृत्यू झाला, जिथे गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर यकृताशी संबंधित आजारांवर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना ईसीएमओ (एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन) सपोर्टवर ठेवले होते. सिद्दिकी यांच्या […]
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज ३३ कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. बरेच दिवसांपासून रखडलेल्या विषयाचा पाठपुरावा करून सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागातील समावेशनाचा प्रश्न मार्गी लावला आणि ३३ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. चंद्रपूर महानगरपालिकेत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर अधिसंख्य पदे निर्माण करून ४ वैद्यकीय अधिकारी व ३३ कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय […]
प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची प्रथम निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना
नवी दिल्ली : फळांच्या निर्यात संधींना चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना केली. डाळिंबाची निर्यातीची ही पहिली खेप अपेडाने, भारतातील राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना (NPPO), अमेरिकेची प्राणी आणि वनस्पती आरोग्य तपासणी सेवा (US-APHIS), […]
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट
मुंबई : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डोंगरी येथील उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट देवून पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. बालकांचे समुपदेशन करताना भेटायला येणाऱ्या पालकांचे समुपदेशन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. येथील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या. यावेळी त्यांनी बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, अन्न […]
रत्नागिरी येथे महाप्रित व कोकण रेल्वेमार्फत शीतगृह उभारणार
मुंबई : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये रत्नागिरी येथे शीतगृह उभारण्याबाबत नुकताच करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या पुढाकाराने रत्नागिरी रेल्वे विभागीय कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कोकण रेल्वे कार्पोरेशनचे संचालक (संचलन व कमर्शियल) संतोषकुमार झा, मुख्य व्यवस्थापक […]










