Fire breaks out near Emergency Ward at Delhi AIIMS Hospital, rescue operation underway
देश

ब्रेकिंग! दिल्ली एम्स रुग्णालयात आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग, बचावकार्य सुरु

नवी दिल्ली : दिल्ली एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. एन्डोस्कोपी कक्षात आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर तात्काळ सर्व रुग्णांना इमर्जन्सी वॉर्डमधून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात देशभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. माहितीनुसार, दररोज सुमारे 12 हजार रुग्ण उपचारासाठी दिल्ली एम्समध्ये पोहोचतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत