rapecase
बीड महाराष्ट्र

बीड हादरले! विधवा महिलेवर चालत्या जीपमध्ये बलात्कार

बीड : एका विधवा महिलेवर दोघांनी चालत्या जीपमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेच्या प्रियकरासमोर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी बीड जिल्ह्यात घडली असून, या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत 26 वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर, ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत बीड शहरात राहत होती. दरम्यान बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील सुरेश नामदेव लंबाटे याच्याशी पीडित महिलेचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर मागील एक वर्षापासून ती आपल्या मुलीसोबत सुरेशसोबत बीडमध्ये राहत आहे.

4 ऑगस्ट रोजी पीडिता रस्त्यावरून पायी जात असताना एक चारचाकी गाडीतून सुरेश लंबाटे खाली उतरला आणि महिलेला गाडीत बसण्यास सांगितले. महिला गाडीत बसली. गाडीत सुरेश लंबाटे याचा भाऊ अमोल नामदेव लंबाटे आणि बापूराव हावळे बसले होते. गाडी काही अंतरावर जाताच अमोल लंबाटे याने महिलेला अचानक मारहाण केली. तसेच तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर अमोल आणि बापूराव यांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच पीडितेला मारहाण केली.

त्यानंतर तिला सुरेश लंबाटे याच्या सात्रापोत्रा गावातील घरी आणण्यात आले. तिथे सुरेश लंबाटेची पत्नी सविताने प्लास्टिक पाईप आणि चप्पलने पीडित महिलेला मारहाण केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित महिलेची सुटका करत, तिला बीड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेश नामदेव लंबाटे, अमोल नामदेव लंबाटे, बापूराव हावळे व सविता सुरेश लंबाटे (सर्व रा. सात्रापोत्रा, ता.बीड) यांच्याविरुद्ध बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत