नाशिक : केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. या योजनेतून जिल्ह्यातील मनमाड रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये ४४.८० कोटी, नगरसुल रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये २०.०३ कोटी, लासलगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये १०.१० कोटी, नांदगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये १०.१४ कोटी निधी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील 19,460 पदांची मेगाभरती
मुंबई : ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के व इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात 5 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास […]
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य
मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली असून यापुढे अशा दुर्घटनेत व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या वारसांना 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात […]
महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2023 चे पावसाळी अधिवेशन विधेयकांची माहिती
मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरवणी मागण्यांद्वारे प्राप्त निधी शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान योजना, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अशा सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध […]
पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित, पुढील अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 रोजी विधानभवन, नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली. विधानपरिषदेत प्रत्यक्षात 88 तास 33 मिनिटे कामकाज विधानपरिषदेत प्रत्यक्षात 88 तास 33 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज […]
विश्वेश्वराय उड्डाणपुलाच्या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करणार – मंत्री उदय सामंत
मुंबई : माटुंगा रोड रेल्वे स्थानकाजवळ विश्वेश्वराय उड्डाणपुलाची डागडुजी करण्यात येत आहे. या पुलाच्या मध्यापासून धारावीच्या दिशेने जाणारा पूल हा धोकादायक वळणाचा असून या ठिकाणी अंधुक बिंदू असल्यामुळे यापूर्वी अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. त्यामुळे या विश्वेश्वराय पुलावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी या पुलालगत असलेल्या बाधित झोपड्यांचे निष्कासन करणे अत्यंत गरजेचे होते. याबाबत तेथील झोपडपट्टीधारक […]
ठाणे मेट्रो प्रकल्पाचे काम ‘एमएमआरडीए‘ कडे देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – उदय सामंत
मुंबई : ठाणे शहरामध्ये उभारावयाचा वर्तुळाकार मेट्रो लाईन प्रकल्प हा सर्व तांत्रिक बाबी तपासून तयार करण्यात आला आहे. या मार्गिकेच्या एकूण 29 किमी लांबी पैकी 3 किमी मार्ग हा भूमिगत आहे. या प्रस्तावाची मान्यता केंद्राकडे प्रलंबित आहे. सदर मेट्रो प्रकल्प महामेट्रो कंपनीकडून राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मार्फत राबविण्याबाबत […]
‘समृद्धी’च्या कामावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेचे विश्लेषण तांत्रिक तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्यात येत आहे. भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्यात येत असून अधिक सुरक्षितता घेण्यासाठी आवश्यक ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री […]
म्हाडा अंतर्गत इमारत पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर म्हाडा प्राधिकरण अन्यथा शासनामार्फत पुढील अधिवेशनात तरतूद करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य प्रवीण दरेकर […]
नागपूर विद्यापीठातील बनावट पदवीप्रकरणी सखोल चौकशी करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून 27 विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकरी मिळवल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून 27 विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकरी मिळवल्याबाबतचा प्रश्न सदस्य मोहन मते उपस्थित […]








