नवी दिल्ली : ऑलिंपिक पात्र बॉक्सर अमित फंगल याला रशियातील गव्हर्नर्स कप स्पर्धेत ब्रॉंझपदका पटकावले. उपांत्य फेरीत त्याला ५२ किलो वजनी गटात शाखोबिदीन झोईरोवकडून पराभव पत्करावा लागला.
जागतिक स्पर्धेत अमितला उझबेकिस्तानच्या झोईरोवकडूनच एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. झोईरोव ऑलिंपिक चॅंपियनही आहे. जागतिक स्पर्धेनतंर(२०१९) अमितचा झोईरावकडून दुसरा पराभव ठरला. हे दोन्ही बॉक्सर टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरले.
Tokyo Olympics bound star Boxer Amit Panghal settles for Bronze in Governor’s Cup in St Petersburg; loses to reigning Olympic & World champion Shakhobidin Zoirov 0-5 in Semis
Amit had lost to Uzbek pugilist 0-5 in Final of 2019 World Championships https://t.co/eiVbUyIT02— India_AllSports (@India_AllSports) April 25, 2021
यावर्षी झोईरोव याला बल्गेरिया येथील स्पर्धेत पराभव पत्करावा लागला आहे. या स्पर्धेत त्याला भारताच्या दीपक कुमार याने हरवले. या स्पर्धेत अमित हा एकमेव भारतीय पदकापर्यंत पोचला. ऑलिंपिक पात्र आशिष कुमार आणि सुमीत संगवान दोघांनाही पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत आता भारताला पदकाच्या सर्वाधिक आशा या अमितकडूनच आहेत. त्याचे हे पहिलेच ऑलिंपिक असले तरी गेल्या तीन वर्षातील त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य राहिले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर त्याने २०१९ मध्ये जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय बॉक्सर ठरला होता.



