India Vs Bangladesh 2nd ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा गंभीर जखमी झाला आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला एक्स-रेसाठी ढाका येथील रुग्णालयात नेण्यात आले. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहितच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
मात्र, तो दुसऱ्या डावात फलंदाजी करेल की नाही याबाबत साशंकता कायम आहे. बीसीसीआयने फलंदाजीबाबत कोणतेही अपडेट जारी केलेले नाही. तसेच तिसर्या वनडेत रोहितच्या खेळण्यावरही साशंकता आहे. सध्या रोहितच्या जागी केएल राहुल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार आहे.
Update: India Captain Rohit Sharma suffered a blow to his thumb while fielding in the 2nd ODI. The BCCI Medical Team assessed him. He has now gone for scans. pic.twitter.com/LHysrbDiKw
— BCCI (@BCCI) December 7, 2022
डावाच्या दुसऱ्या षटकात झाली दुखापत
बांगलादेशच्या डावाच्या दुसऱ्याच षटकात रोहितला दुखापत झाली. त्यावेळी तो स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. सिराजचा चेंडू अनामूल हकच्या बॅटला लागून स्लिपमध्ये गेला. चेंडू रोहितच्या हाताला लागून पडला. यादरम्यान त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर रोहित वेदनेने ओरडताना दिसला. त्याला लगेच मैदानाबाहेर नेण्यात आले.
यानंतर वैद्यकीय पथकाने त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर अनामूल हक बाद झाला. सिराजने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. बीसीसीआयने याला दुजोरा दिला आहे. या सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत राहुल कर्णधार आहे. रोहित टी-२० विश्वचषकानंतर पहिली मालिका खेळत होता. न्यूझीलंड दौऱ्यातून त्याला विश्रांती देण्यात आली होती. या वर्षातील रोहितची ही तिसरी वनडे मालिका आहे. त्याचबरोबर भारताने एकूण आठ वनडे मालिका खेळल्या आहेत.
टीम इंडियाचे लक्ष वनडे वर्ल्ड कपवर आहे.
रोहितने अखेरची वनडे मालिका जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्यानंतर त्याचे लक्ष टी-२० विश्वचषकावर होते. आता भारताला पुढील वर्षी मायदेशात वनडे विश्वचषक खेळायचा आहे. अशा स्थितीत रोहित वनडेवर पूर्ण लक्ष देत आहे. रोहितशिवाय विराट कोहली आणि राहुलही या मालिकेत पुनरागमन करत आहेत. हे दोघेही न्यूझीलंड दौऱ्यावर गेले नव्हते.
रोहितच्या कसोटी मालिकेत खेळण्यावरही संशय
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेशिवाय भारताला बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे. ही मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. रोहितला कसोटीसाठीही कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, या दुखापतीनंतर त्याच्या कसोटी मालिकेतही खेळण्याबाबत साशंकता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने ही कसोटी मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे.