भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली. रामनाथ कोविंद यांना मागील आठवड्यात छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, “भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांची एम्स, दिल्ली येथे यशस्वी बायपास शस्त्रक्रिया झाली. यशस्वी ऑपरेशनसाठी मी डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन करतो. राष्ट्रपतीजींच्या आरोग्याबद्दल चौकशी करण्यासाठी एम्स संचालकांशी बोललो. त्यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो.”
The President of India, Shri Ramnath Kovind has undergone a successful bypass surgery at AIIMS, Delhi.
I congratulate the team of Doctors for successful operation. Spoke to Director AIIMS to enquire about Rashtrapatiji’s health. Praying for his well-being and speedy recovery.
— Rajnath Singh (@rajnathsingh) March 30, 2021




