Motera Stadium renamed 'Narendra Modi Stadium'
महाराष्ट्र

..म्हणूनच मृत्यूआधी स्टेडियम आपल्या नावे करुन घेतलं, प्रकाश आंबेडकर यांची मोदींवर बोचरी टीका

गुजरातमधील मोटेरा स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आल्याने भाजपवर टीका होत आहे. या विषयावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली आहे. नरेंद्र मोदींचा लोकांवर विश्वास नाही, की मृत्यूनंतर कोणी आपल्याला लक्षात ठेवेल की नाही. म्हणून मृत्यूआधी स्टेडियम आपल्या नावे करुन घेतलं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मतदारसंघामध्ये हे भव्य स्टेडियम उभारण्यात आलं आहे. या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले. यावरुनच प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं कि, “काय नेता मिळाला आहे देशाला. यांना लोक आपल्याला विसरुन जातील याची चिंता आहे. यांचा लोकांवर विश्वास नाही, की मृत्यूनंतर कोणी आपल्याला लक्षात ठेवेल की नाही. म्हणूनच मृत्यूआधी स्टेडियम आपल्या नावे करुन घेतलं.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत