Musician and former BJP MP Mahesh Kanodia
देश मनोरंजन

संगीतकार महेश कनोडिया यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख

गुजरातचे सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार आणि पाटण लोकसभेचे भाजपचे माजी खासदार महेश कनोडिया यांचे आज (रविवारी) निधन झाले. कनोडिया बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. दीर्घ आजारानंतर गांधीनगरात त्यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दीर्घ आजारानंतर संगीतकार महेश कनोडिया यांनी गांधीनगर येथील निवासस्थानी आज अखेरचा श्वास घेतला. महेश कानोदिया स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही स्वरांमध्ये गाऊ शकत होते. महेश लताजी, रफी साहब इत्यादी 32 कलाकारांच्या आवाजात गाणी गाण्यासाठी देखील प्रसिद्ध होते. महेश हे बर्‍याच काळासाठी पाटण लोकसभेचे खासदारही होते.

महेश हे 80 च्या दशकात गुजराती फिल्म इंडस्ट्रीचे पहिले गुजराती स्टार आहेत, ज्यांनी भारताबाहेर आपली प्रतिभा दाखविली. आफ्रिका, अमेरिका आणि आशिया खंडातील काही देशांच्या मंचांवर त्यांनी कामगिरी बजावली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत