एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालं होतं. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी तेच बघायचं आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, “चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आलात”.
चंद्रकांत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अटल बस सेवेचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपात आलात. तसंच माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन असं विधान एकनाथ खडसे यांनी केल्यासंबंधी विचारलं. त्यावेळी त्यांनी ‘रात गयी, बात गयी’ म्हणत हा विषय संपवला.




