Price of Sputnik V vaccine imported from Russia to India announced
कोरोना देश

रशियातून भारतात आयात केलेल्या स्पुटनिक व्ही लसीची किंमत जाहीर

नवी दिल्ली : रशियातून भारतात आयात करण्यात आलेल्या स्पुटनिक लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या डोसची किंमत भारतात प्रतिडोस 995.40 रुपये असणार आहे, अशी माहिती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दिली आहे. ९१.६ टक्के कार्यक्षमता असणारी स्पुटनिक व्ही भारतातील वापरासाठी मंजूर झालेली तिसरी लस आहे. स्पुटनिक लस भारतीय मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने स्टॉक एक्सचेंजला स्पुतनिकच्या डोसच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. या लसीचेही दोन डोस घेणं बंधनकारक आहे. या कंपनीने या लसीच्या एका डोससाठी किंमत 948 रुपये ठेवली आहे. त्यावर 5 टक्के जीएसटी लागणार आहे. भारतात या लसीची निर्मिती झाल्यास त्याची किंमत कमी होईल. येत्या काही महिन्यांत आयात डोसची आणखी एक खेप अपेक्षित आहेत. त्यानंतर, स्पुटनिक व्ही लसीचा पुरवठा भारतीय उत्पादक भागीदारांकडून सुरू होईल, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

डॉ. रेड्डीज यांनी मर्यादित प्रयोगिक तत्त्वावरील वापरासाठी तसेच सॉफ्ट लॉन्चिंगचा भाग म्हणून आज लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये दिला. पुढच्या आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्राने गुरुवारी दिली. विविध राज्यांत लसीची कमतरता भासत आहे. १३ एप्रिलला भारतात आपातकालीन वापरासाठी स्पुटनिक व्ही लशीला मंजुरी देण्यात आली आणि या लसीच्या डोसची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत