death of a woman who fought with corona saying love u zindagi

दुःखद : कोरोनाशी आत्मविश्वासाने लढणाऱ्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू

कोरोना देश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अक्षरशः थैमान घातले असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि बेड्स उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘लव यू जिंदगी’ या गाण्यासोबत एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. लोकांमध्ये थोड्याफार प्रमाणात सकारात्मता निर्माण व्हावी म्हणून ‘कधीही आशा गमावू नका’ असे सांगत डॉ. मोनिका यांनी तो व्हिडीओ बनवला होता. मात्र, त्या महिलेचा आता मृत्यू झाला आहे. त्या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉ. मोनिका यांनी याची माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉ. मोनिका लांगेह यांनी रुग्णालयातील एका ३० वर्षीय महिलेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. व्हिडिओमधील महिला कोरोना पॉझिटिव्ह असताना देखील उत्साही दिसत होती. गुरुवारी रात्री डॉ. मोनिका यांनी त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती ट्विटरवर दिली. त्या म्हणाल्या कि, “मी खूप दुःखी आहे, आपण खूप शूर मुलीला गमावले. ओम शांति. तिच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी प्रार्थना करा.” यानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.

डॉ. मोनिका यांनी ८ मे रोजी एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुण मुलीला आयसीयू बेड मिळाला नव्हता यामुळे ती कोव्हिड आपत्कालीन कक्षात गेल्या १० दिवसांपासून दाखल होती. या महिलेने गाणी ऐकता येतील का असे डॉ. मोनिका यांना विचारले होते. डॉक्टरने डियर जिंदगी चित्रपटातील ‘लव यू जिंदगी’ हे गाणं लावलं. डॉक्टर मोनिका यांनी व्हिडीओ बनवत तिच्यात दृढ इच्छाशक्ती आहे असे लिहिले होते. हा व्हिडिओ शेअर करत डॉ. मोनिका यांनी ‘धडा: कधीही आशा गमावू नका’ असे लिहिले होते.

तिला NIV सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त तिच्यावर रेमडेसिवीर आणि प्लाझा थेरपीद्वारे उपचार करण्यात येत होते. त्यानंतर तिला आयसीयू बेड मिळाला होता. पण, दुर्दैवाने या महिलेचा मृ्त्यू झाला आहे. या महिलेचे नाव श्रुती असून तिला ५ वर्षांचं मुलदेखील असल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत