होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) गुरुवारी भारतात मीड-साइज 350-500 सीसी सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. कंपनीने हायनेस सीबी 350 ही नवी बाइक बाजारात आणली असून तिची किंमत 1.85 लाख रुपये आहे. कंपनीकडून प्राप्त झालेली ही बाइक ‘बिगविंग’ पोर्टफोलिओ मधील तिसरे बीएस-वीआय मॉडेल आहे. जे एक्सक्लुझिव्ह प्रीमियम बाइक व्हर्टिकल आहे.
‘हायनेस सीबी 350’ ही बाइक ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात देशांतर्गत उत्पादित केली गेली आहे. हरियाणाच्या मानेसर येथील कंपनीच्या प्लांटमध्ये याची निर्मिती केली जात आहे. कंपनीने म्हटले आहे की, प्रथम त्यांचा प्रयत्न हा भारतीय बाजाराची मागणी पूर्ण करण्यावर असणार आहे. त्यानंतर ते इतर देशातील बाजारपेठेत प्रवेश करतील. कंपनीने‘बिग विंग’स्टोअरमध्ये त्याची बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
हायनेस सीबी 350 बाइकमध्ये शक्तिशाली 350 सीसी एअर कूल्ड 4-स्ट्रोक ओएचसी सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. जे पीजीएम-एफआय तंत्रज्ञानाने सज्ज आहे. यात ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि इतर फीचर्ससह एक १५ लिटर इंधन टाकी आहे. यात अतिरिक्त दृश्यमानतेसाठी फ्रंट आणि बॅक-एंड फुल एलईडी सेटअप आहे.




