Apple च्या आजच्या वार्षिक लॉंच कार्यक्रमात iPhone 12 सीरिजचे लॉंच होणार आहे. हा लॉन्चिंग कार्यक्रम भारतीय वेळेप्रमाणे रात्री 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे. Apple त्यांच्या कार्यक्रमात iPhone 12 सीरिजमधील चार स्मार्टफोनचे लॉन्च करणार आहे. यात iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. या सर्व डिव्हाईसमध्ये 5G ची सेवा असणार आहे.
एका वृत्तानुसार iPhone 12 mini च्या डिस्प्लेचा आकार हा 5.1 इंच इतका असेल आणि याची किंमत 51 हजार इतकी असू शकते. 6.1 इंच डिस्प्ले असणाऱ्या iPhone 12 ची किंमत जवळपास 58 हजार 300 इतकी असेल. या दोन्ही स्मार्ट फोनमध्ये ड्युएल कॅमेराची सोय आहे. तसेच यात 64GB पासून 256GB स्टोरेजची व्यवस्था असण्याची शक्यता आहे. iPhone 12 Pro चा डिस्प्ले हा 6.1 इंच असू शकतो तर त्याची किंमत ही 73 हजार असू शकते. iPhone 12 Pro Max चा डिस्प्ले 6.7 इंच असेल आणि त्याची सुरुवातीची किंमत ही 80 हजार इतकी असू शकेल. कंपनीने अधिकृतरित्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
अहवालात सांगितले आहे की, iPhone 12 चे डिझाईन iPhone 4 शी मिळते जुळते आहे. नवा आयफोन हा फ्लॅट एज असू शकतो तसेच त्याला स्टेनलेस स्टीलची चौकट देखील असू शकते. सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे 5G मोबाईल उपलब्ध आहेत. Apple ची iPhone 12 सीरिज ही पहिली 5G सीरिज असेल. कंपनीचे विश्लेषक मिंग-ची कूओ यांच्या मते सर्व चारही आयफोन 5G असतील.




