विवोने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Vivo V20 Pro 5G आज भारतात लॉन्च केला आहे. या फोनची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत लॉन्च केले आहे. या फोनचा सेल आजपासून सुरू झाला आहे. फोनमध्ये ड्यूल सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हा फोन याआधी थायलंड मध्ये लॉन्च करण्यात आला होता.
Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्स :
- या फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे.
- ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 765G SoC प्रोसेसर दिला आहे.
- हा स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड Funtouch OS 11 वर काम करतो.
- फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक २ मेगापिक्सलचा मोनोक्रॉम सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात ४४ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे.
- फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन ३३ वॉटच्या फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसोबत येतो.
- कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय, जीपीएस, यूएसबी टाइप-C पोर्ट यासारखे ऑप्शन दिले आहेत.