Veteran journalist Vinod Dua passes away
देश

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआ हिने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. भारतातील टीव्ही पत्रकारितेतील अग्रगण्य नाव असलेले विनोद दुआ यांनी बराच काळ पत्रकारितेच्या कारकिर्दीत दूरदर्शन आणि NDTV […]

Famous actress Madhavi Gogte passed away
मनोरंजन

दुःखद! अभिनेत्री माधवी गोगटे यांचं कोरोनाने निधन

मुंबई : अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माधवी गोगटे यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीसह टेलिव्हिजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित […]

Shivshahir Babasaheb Purandare passed away
पुणे महाराष्ट्र

महान पर्वाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा […]

Actor Chandrakant Pandya passed away
मनोरंजन

‘रामायण’ या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन

मुंबई : ‘रामायण’ या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे. ‘रामायण’ मध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलियाने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे. ‘रामायण’मध्ये भगवान राम यांचा बालपणीचा मित्र निषाद राजची भूमिका चंद्रकांत यांनी साकारली होती. दीपिका चिखलियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘निषाद राज’ अर्थात चंद्रकांत पंड्या यांचा फोटो शेअर […]

Actor Arvind Trivedi passed away
मनोरंजन

‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन

मुंबई : लोकप्रिय मालिका ‘रामायण’मधील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यानं मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. […]

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Nattu Kaka Aka Ghanshyam Nayak Passes Away
मनोरंजन

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम नट्टू काका यांचे निधन

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील नट्टू काका यांचे निधन झाले आहे. नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. शोचे निर्माते असित मोदी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की नट्टू काका बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना […]

Akshay Kumar's mother dies
मनोरंजन

अक्षय कुमारच्या आईचे निधन

मुंबई : अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अक्षयने स्वतः ट्विट करून त्याच्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. अक्षयने ट्विट करत म्हटले कि, “माझी आई माझा कणा होती. मला आज असे दुःख वाटत आहे, जे मी […]

Ayurvedacharya Balaji Tambe passes away
पुणे महाराष्ट्र

दुःखद! आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे आज (१० ऑगस्ट) निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. मागील आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक […]

Actor Anupam Shyam passes away at 63 due to multiple organ failure
मनोरंजन

दुःखद! ‘मन की आवाज : प्रतिज्ञा’ फेम अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन

मुंबई : अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे आज (8 ऑगस्ट) निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. अभिनेता अनुपम श्याम सुमारे सहा दिवसांपासून रुग्णालयात होते. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने आज रात्री 8 वाजता निधन झाले. अनुपम श्याम टीव्ही शो ‘मन की आवाज : प्रतिज्ञा’ मधील त्यांच्या ठाकूर सज्जन सिंह या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी स्लमडॉग […]

1983 World Cup Winner Member Yashpal Sharma Dies Of Heart Attack
क्रीडा

ब्रेकिंग : माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन, १९८३ विश्वचषक जिंकण्यात मोलाचा वाटा

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशपाल शर्मा १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. यशपाल शर्मा हे 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक महत्त्वाचा भाग होते. त्यांनी विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात 89 धावांचा शानदार डाव […]