पुणे : रात्रपाळीसाठी कामावर निघालेल्या 27 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील मेदनकरवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने पीडितेला दिली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास करत अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रकाश तुकाराम भांगरे (रा. मेदनकरवाडी, मूळ रा. […]
टॅग: police investigation
धक्कादायक! माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची राहत्या घरात हत्या; पत्नीवर गंभीर आरोप
बेंगळुरू: कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली आहे. रविवारी (२० एप्रिल) संध्याकाळी बेंगळुरूमधील एचएसआर लेआउटमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यांची पत्नी पल्लवीनेच त्यांची हत्या केल्याचं बोललं जात आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने त्यांची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पत्नीने स्वतः पोलिसांना याबाबतची माहिती दिली. राज्य पोलीस विभागाचे प्रमुख असलेल्या […]
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, नंतर पोलीस ठाण्यात पतीची आत्महत्या
पुणे : तळवडे येथील शरद रूपचंद चितळे (वय ३५) नावाच्या व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला गळा दाबून मारले. यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून त्याला वाचवले. मात्र, त्यानंतर चौकशीसाठी चिखली पोलिस ठाण्यात बोलावले असता तेथेच त्याने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, चितळे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. त्याची पत्नी […]
हृदयद्रावक! पाण्याच्या टँकरखाली चिरडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, चालकाला अटक
पुणे : पाण्याच्या टँकरच्या मागील चाकाखाली चिरडून एका १८ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शनिवारी संध्याकाळी वारजे येथील गणपती माथा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी टँकर टँकर चालक सनी प्यारे बारस्कर (वय ३३) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलाचे नाव अधोक्षक महेश वहाळे असे आहे, जो […]
प्रेम प्रकरणातून योग शिक्षकाची हत्या, सात फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडलं…
हरियाणा : हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मांडोठी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामध्ये एका योग शिक्षकाला प्रेमसंबंधांच्या कारणातून त्याचा जीव गमवावा लागला. जगदीप झझ्जर नावाच्या योग शिक्षकाचे डिसेंबर महिन्यात अपहरण झाले होते. तीन महिने त्याचा शोध घेतल्यानंतर अखेर, २४ मार्च २०२५ रोजी, पोलिसांनी चरखी दादरी गावाजवळ सात फूट खोल खड्ड्यात त्याचा मृतदेह सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, […]
आदित्य ठाकरेंचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग, उद्धव ठाकरे पण आरोपी, वकील निलेश ओझांचे सनसनाटी आरोप
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांचे वकील ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्याची मागणी करत तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशाची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. वकील ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत अनेक गंभीर आरोप आणि […]
लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह
पुणे : पुणे शहराच्या सांगवी भागात राहणारी 21 वर्षीय मानसी प्रशांत गोविंदपूरकर हिचा मृतदेह बुधवारी सकाळी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नवग्रह मंदिराजवळ आढळला. मानसी 18 मार्च 2025 पासून बेपत्ता होती, आणि तिचा शोध घेतला जात होता. मानसी लोहगड किल्ल्यावर एकटीच गेली होती, तिने तिथे पोहोचण्यासाठी खाजगी टॅक्सी बुक केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी ८:५६ वाजता […]
नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंडचे नाव तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारामागे फहीम खान नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचे समोर आले आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष असल्याची माहिती आहे. फहीम खान नावाच्या व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ३८ वर्षीय फहीम खान हा मायनॉरिटी […]
जोधपूर लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली, ३ जणांचा मृत्यू
राजस्थान : आज (११ मार्च) राजस्थानातील नागौर जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला, ज्यामध्ये जोधपूर येथील राष्ट्रीय कायदा विद्यापीठ (एनएलयू) च्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली. ही बस चंदीगड येथील राजीव गांधी राष्ट्रीय कायदा विद्यापीठाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन परत येत होती. सकाळी ५.३० वाजता देह गावाजवळ झालेल्या या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि […]
नागपुरात दिवसाढवळ्या हत्येची घटना, फुटपाथवर दुकान थाटण्यावरून झालेल्या वादातून भयंकर कृत्य
नागपूर : नागपूरच्या रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्येची भयंकर घटना घडली आहे. फुटपाथवरील दुकान थाटण्यावरून सुरु झालेला वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. भररस्त्यात भाजी विक्रेत्याने त्याच्या एका साथीदारासह गॅरेज चालकाची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव विशाल निकोसे (वय ३७, रा. पांढराबोडी) असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. […]










