Raid on Dragonfly Club in Mumbai, case filed against 34 people including Suresh Raina
महाराष्ट्र मुंबई

मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा, सुरेश रैनासह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकला असता ही कारवाई करण्यात आली आहे. या क्लबमध्ये सुरेश रैना उपस्थित होता. सुरेश रैनासोबत सुझेन खानसह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाशी संबधित नियमांचं पालन न केल्याने आणि वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही […]

Accused arrested
महाराष्ट्र मुंबई

50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग आणि अश्लील चाळे केलेल्या आरोपीला अटक

मुंबई : मालाड पूर्व दिंडोशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या तीस वर्षीय व्यक्तीच्या चौकशीमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. गेल्या 9 वर्षात 50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग केला असल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. या आरोपीला 2011 साली एका महिलेसमोर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतरही या […]

TRP scam: Republic TV CEO Vikas Khanchandani arrested
मुंबई

टीआरपी घोटाळा : रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याआधीही पोलिसांनी विकास खानचंदानी यांची चौकशी केली होती. आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. […]

Ban on drones, paragliders etc. at Mumbai Police Commissionerate
मुंबई

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्स आदी उपकरणांवर बंदी

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून, या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले […]

Arnav Goswami remanded in judicial custody
महाराष्ट्र

अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी.

अलिबाग : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची ठाकरे सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली. अर्णव गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. उद्या मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल. अर्णव गोस्वामी यांना न्याय नक्की मिळेल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला […]

Kangana Ranaut Over Arnab Goswami
देश महाराष्ट्र मुंबई

तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? – कंगना रानौत

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली. अर्णब गोस्वामी यांनी पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. कंगनाने […]

महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल; अर्णब गोस्वामी यांना अटक

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल झाले आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शारीरिक अत्याचार केल्याचे अर्णब गोस्वामी यांचे म्हणणे आहे.  अर्णब गोस्वामी आणि पोलीस यांच्यात भांडण झाल्याचे रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्क्रीनशॉटमध्ये दिसते आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही […]

kangana ranaut
मुंबई

कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे मुंबई पोलिसांना कोर्टाकडून आदेश

वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनासोबत तिची बहीण रंगोलीविरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे. वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात […]

sushant singh rajput
महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी उघडले गेले फेक अकाऊंटस्; आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला […]

मुंबईत आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा जमावबंदी
कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांवर पुन्हा एकदा निर्बंध येणार; आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू

मुंबई : आता पुन्हा एकदा मुंबईकरांवर निर्बंध येणार आहेत. मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू करण्यात येणार आहे. ही जमावबंदी ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. याविषयी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरीही कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन यावेळी करण्यात आलेला नाही. मात्र, यावेळी नागरिकांना कुठेही गर्दी करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या […]