Raid on Dragonfly Club in Mumbai, case filed against 34 people including Suresh Raina

मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा, सुरेश रैनासह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र मुंबई

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकला असता ही कारवाई करण्यात आली आहे. या क्लबमध्ये सुरेश रैना उपस्थित होता. सुरेश रैनासोबत सुझेन खानसह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोनाशी संबधित नियमांचं पालन न केल्याने आणि वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून क्लबच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान काही जण मागील दरवाजाने पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस त्यांचा देखील शोध घेत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत