Prime Minister Modi spoke on a number of topics at the AMU event
देश

पाच दशकानंतर देशाचे पंतप्रधान AMU च्या कार्यक्रमात, पंतप्रधान मोदी बोलले अनेक विषयांवर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या (AMU) शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले. ‘अलिगढ मुस्लिम विद्यापीठांच्या भिंतीवर देशाचा इतिहास आहे. येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात भारताचं नावं प्रकाशमान केलं’ असं पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एक टपाल तिकीटही जारी केलं. जवळपास पाच दशकानंतर देशाचे पंतप्रधान एएमयूच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मतभेद बाजुला सारायला हवेत
गेल्या शतकात मतभेदांच्या नावावर बराच काळ वाया गेला आहे. आता वेळ गमावता कामा नये, प्रत्येकाला एका ध्येयासोबत आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे. समाजात वैचारिक मतभेद आहेत, परंतु जेव्हा राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्याची वेळ येते तेव्हा मतभेद बाजुला सारायला हवेत. हाच विचार आपले तरुण साथी पुढे नेतील तेव्हा कोणतंही असं उद्दीष्ट राहणार नाही जे आपण साध्य करू शकणार नाही. राजकारण आणि सामर्थ्याच्या विचारांपेक्षा एखाद्या देशाचा समाज खूप मोठा असतो, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

विकास कुणासाठी थांबू शकत नाही
आपल्याला सामान स्तरावर काम करावे लागेल. सर्व 130 कोटी देशवासीयांना याचा फायदा होणार आहे. तरुण हे करू शकतात. आपल्याला हे समजले पाहिजे की राजकारण हा समाजातील एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु समाजात यापेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न आहेत. राजकारणापेक्षा महत्वाच्या अनेक गोष्टी असतात. राजकारण-समाज वाट पाहू शकतात, पण विकास कुणासाठी थांबू शकत नाही.

आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे
आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. भारताला आत्मनिर्भर कसं बनवावं, हेच आपल्या सर्वांचं एकनिष्ठ लक्ष्य असायला हवं, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

महिलांचं योगदान महत्वाचं
पूर्वी मुस्लीम मुलींचं शाळा सोडण्याचं प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक होतं आता ते ३० टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. आपल्या देशातील तरुण ‘नेशन फर्स्ट’च्या आवाहनासोबत देशाला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहेत. एक शक्तीशाली महिलेचं प्रत्येक निर्णयात तितकंच योगदान असतं जेवढं इतर कुणाचं. मी देशातील अन्य शैक्षणिक संस्थांनाही हेच सांगेन की जास्तीत जास्त मुलींना शिक्षणामध्ये सहभागी करून घ्या, असं पंतप्रधान म्हणाले.

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास
सर सय्यद म्हणाले होते की देशाची काळजी घेणार्‍या लोकांचे सर्वात मोठे कर्तव्य म्हणजे त्यांचे धर्म, जाती विचार न करता लोकांसाठी काम करणे. ज्याप्रमाणे मानवी जीवनासाठी प्रत्येक अवयव निरोगी असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सर्व स्तरांवर समाजाचा विकास आवश्यक आहे. आज प्रत्येक योजना कोणत्याही धार्मिक भेदभावाशिवाय प्रत्येक वर्गापर्यंत पोहचत आहे. ४० कोटींहून अधिक गरीबांची बँक खाती भेदभाव न करता उघडली गेली. दोन कोटींहून अधिक गरिबांना पक्की घरं देण्यात आली. कोणत्याही भेदभावाशिवाय आठ कोटींहून अधिक महिलांना गॅस मिळाला. देश आज अशा मार्गावर पुढे वाटचाल करत आहे, जिथे धर्मामुळे कुणीही मागे सुटणार नाही, सर्वांना पुढे वाटचालीसाठी समान संधी निर्माण होईल. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मूळमंत्र आहे, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

सरकारचं शिक्षण क्षेत्रातील काम 
सरकारनं मेडिकल एज्युकेशनसंबंधी खूप काम केलंय. सहा वर्षांपूर्वी देशात केवळ ७ एम्स होते. आज देशात २२ एम्स आहेत. २०१४ मध्ये देशात १६ आयआयटी होते. आज देशात २३ आयआयटी आहेत. २०१४ मध्ये देशात ९ आयआयआयटी होते. आज देशात २५ आयआयटी आहेत. २०१४ मध्ये देशात १३ आयआयएम होत्या. आज देशात २० आयआयएम आहेत. शिक्षण ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन ते प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवं, बरोबरीनं पोहोचायला हवं, प्रत्येकाचं आयुष्य बदलायला हवं, याच ध्येयासह आम्ही काम करत आहोत.

एएमयू म्हणजे मिनी इंडिया
आज एएमयू येथे शिक्षण घेतलेले लोक जगातील कोणत्याही भागात भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात. मला अनेक लोक म्हणतात की, एएमयू कॅम्पस स्वत:च एक शहर आहे. अनेक विभाग, डझनभर वसतिगृहे, हजारो शिक्षक-विद्यार्थी. यात एक मिनी इंडियाच दिसून येतो. इथे एकीकडे उर्दू शिकवली जाते तर हिंदीही, अरबी शिकवली जाते तर संस्कृतीचं शिक्षणही दिलं जातं, असंही मोदींनी म्हटलं.

कोरोनाकाळात एएमयूचं योगदान
कोरोना संकटकाळात एएमयूनं समाजाला ज्यापद्धतीनं मदत केली ती अभूतपूर्व आहे. नागरिकांना नि: शुल्क चाचणी उपलब्ध करून देणं, आयसोलेशन वॉर्ड तयार करणं, प्लाझ्मा बँक तयार करणं आणि पीएम केअर फंडात मोठं योगदान देणं हे समाजाप्रती आपली जबाबदारी पूर्ण करण्याचं गांभीर्य दर्शवतं, असं मोदी म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत