Karima Baloch's body was found under mysterious circumstances
ग्लोबल

करीमा बलोच यांचा मृतदेह रहस्यमय परिस्थितीत आढळला

इस्लामाबाद : सामाजिक कार्यकर्त्या करीमा बलोच (37) यांचा मृतदेह कॅनडाच्या टोरोंटो शहरात रहस्यमय परिस्थितीत सापडला. २० डिसेंबर रोजी त्या बेपत्ता झाल्या होत्या. कॅनडियन पत्रकार तारेक फतेह यांनी बलोच यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कॅनडाच्या शरणार्थी असलेल्या बलोच यांचे नाव 2016 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. पाकिस्तानने केलेले अत्याचार संयुक्त राष्ट्रासमोर मांडणाऱ्या महिलांपैकी त्या एक होत्या. पाकिस्तान करीमा बलोच यांना रॉचा एजंट मानत होता. बलुचिस्तान प्रांतात संसाधनांची कमतरता नाही, परंतु पाकिस्तानकडून रहिवाशांची मुस्कटदाबी होत असल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानी सैन्याकडून क्रौर्याचा वापर करुन विनाकारण नागरिकांना तुरुंगात डांबल्याचा आरोप केला जातो. यापूर्वीही काही बलुची नेत्यांची हत्या झाली होती.

करीमा बलोच बलुचिस्तानातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा होत्या. मोदींना भाऊ संबोधून त्यांनी आंतरराष्ट्रीय फोरममध्ये मानवाधिकार उल्लंघनाविरोधात आवाज उठवण्यास सांगितलं होतं. 2016 मध्ये करीमा यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण भाऊ मानत असल्याचं म्हटलं होतं. करीमा म्हणाल्या होत्या कि, “आम्ही आपणास आवाहन करतो की, आमचा भाऊ या नात्याने तुम्ही बलुचिस्तानमधील नरसंहार आणि युद्ध अपराधांविषयी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोला आणि बलुचच्या बहिणींचा आवाज व्हा… आम्ही स्वतःच लढा देऊ, तुम्ही फक्त आमचा आवाज बनावं,  अशी आमची इच्छा आहे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत