मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच मुकूल रोहतगी यांनी व्हर्च्युअल सुनावणी ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती केली. ते म्हणाले की, “आम्ही सहा ते सात वकील वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. त्यामुळे आम्हाला संवाद साधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे प्रकरण किचकट आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात […]
टॅग: Maratha reservation
ब्रेकिंग : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तूर्तास नकार
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवण्यास तूर्तास नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवल्याने आता पुढील सुनावणी होईपर्यंत नोकरभरती, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत आरक्षण लागू करता येणार नाहीये. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने लावलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू […]
मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला सुनावणी
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी […]
पंकजा मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल, अनेक वर्षे सत्ता, तरीही मराठा आरक्षण देता आलं नाही
औरंगाबाद : पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या कि राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही. त्या पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवार शिरीष बोराळकरच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. औरंगाबादमध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी […]
मराठा आरक्षण स्थगितीमुळे रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश एसईबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षणचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत […]
मराठा आरक्षण : राज्य शासनाच्या घटनापीठ स्थापन करण्याच्या अर्जावर लवकरच निर्णय
मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी हे सांगितल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० […]
आम्ही तिघांनाच राजे मानतो – प्रकाश आंबेडकर
पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उदयनराजे भोसले आमनेसामने आले असून, प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोडलेल्या टीकेला आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान उदयनराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात्तील वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली […]
मराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही – पार्थ पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात जात मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंतीही सरकारकडे केली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार आक्रमक झाल्याचं दिसत आहे. पार्थ पवार यांनी ट्विट […]
मराठा आंदोलनाची पहिली ठिणगी; सोलापूर जिल्ह्या बंद
सोलापूर : मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान आंदोलनाची पहिली ठिणगी सोलापुरात पडली आहे, सोलापुरात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सकल […]
काही होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग?- खासदार उदयनराजे भोसले
“मी कधी राजकारण करत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच,” असं वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. मराठा आरक्षणाबाबत एक ठोस निर्णय व्हावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. “इतर समाजांप्रती मला आदर आहे. मात्र प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. न्यायालयाने सर्वांना समान अधिकार द्यावेत. न्याय […]










