Breaking: Supreme Court refuses to lift moratorium on Maratha reservation

ब्रेकिंग : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तूर्तास नकार

महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवण्यास तूर्तास नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवल्याने आता पुढील सुनावणी होईपर्यंत नोकरभरती, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत आरक्षण लागू करता येणार नाहीये.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने लावलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राज्य सरकारला अजूनतरी यामध्ये यश आलेले नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या चौथ्या आठवड्यात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती राज्य शासनाचे वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतकी यांनी केली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत