start all the educational admissions which were delayed due to the postponement of Maratha reservation
महाराष्ट्र शैक्षणिक

मराठा आरक्षण स्थगितीमुळे रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश एसईबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षणचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये अशी मागणी, मराठा वर्गाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय घेत यासंदर्भातील जीआरही राज्य सरकारने जारी केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार, अशी विचारणा करण्यात येत होती. राज्य सरकारने यासंदर्भात अखेर निर्णय घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण आता न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश सरसकट सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातून विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने एकीकडे याचिका केली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडलेली होती. अशातच आता विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आणखी न रखडवता सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत