मुंबई : राज्यात गणेशोत्सवाची शुक्रवारी सांगता झाली. यानंतर शुक्रवारपासून सुरू झालेल्या विसर्जन प्रक्रियेत 19 जणांना जीव गमवावा लागला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील विविध भागात १९ जणांचा मृत्यू झाला, त्यातील १४ जणांचा मूर्ती विसर्जनाच्या वेळी बुडून मृत्यू झाला. यासह रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी विसर्जनाच्या अगोदर […]
टॅग: maharashtra
अभिमानास्पद! उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, राज्याला एकूण 84 पोलीस पदक
नवी दिल्ली : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 84 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 42 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी […]
महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : पीक पधद्धतीतील वैविध्य, सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आदींच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यावर राज्याचा भर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निती आयोगाच्या बैठकीत सांगितले. निती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांनुसार राज्य सरकार विविध उपयायोजनांच्या माध्यमातून देश […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरिता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान ‘भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरती प्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरती प्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा […]
महाराष्ट्रात आता मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक केले जाणार, ‘हे’ आहे कारण…
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) श्रीकांत देशपांडे यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात आता मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक केले जाणार आहे. यासोबतच देशपांडे म्हणाले की, १ ऑगस्ट २०२२ पासून संपूर्ण राज्यात याची प्रक्रिया सुरू होणार आहे. श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करण्यासाठी हे पाऊल […]
मोठी बातमी! राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा, आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ८ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार (६४ मिमी ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोकण […]
राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, आज ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
पुणे : भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील ५ दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे, प्रशासनाला कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे जिल्ह्यातील घाट भागात आजपासून 9 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढचे […]
ब्रेकिंग! एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातून बाहेर राहणार
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही, तर एकनाथ शिंदे असतील. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. आज फक्त एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी बाहेर राहणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. या […]
माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला खुलं आव्हान
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानावरुन शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला. आदित्य ठाकरेंसह सर्व पदाधिकारी शिवसेना भवनातून चर्चेत सहभागी झाले होते. “एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय कमी केलं? नगर विकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती दिली” असा सवाल यावेळी ठाकरेंनी विचारला. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, असं खुलं आव्हान […]
महाराष्ट्रात आज 5218 कोरोना रुग्णांची नोंद, सध्या राज्यात 24867 सक्रिय प्रकरणे
मुंबई : महाराष्ट्रात आज एकूण 5218 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, तर 4989 रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, एका रुग्णाचा कोविड-१९ च्या गुंतागुंतांमुळे मृत्यू झाला. सध्या राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.86% आहे. सध्या महाराष्ट्रात 24867 सक्रिय प्रकरणे आहेत, ज्यात मुंबईत 13,614, ठाण्यात 5488 आणि पुण्यात 2443 आहेत.










