The body of a person
महाराष्ट्र

राज्यात गणपती विसर्जनावेळी वेगवेगळ्या घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गणेशोत्सवाची शुक्रवारी सांगता झाली. यानंतर शुक्रवारपासून सुरू झालेल्या विसर्जन प्रक्रियेत 19 जणांना जीव गमवावा लागला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील विविध भागात १९ जणांचा मृत्यू झाला, त्यातील १४ जणांचा मूर्ती विसर्जनाच्या वेळी बुडून मृत्यू झाला. यासह रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी विसर्जनाच्या अगोदर होणाऱ्या आरतीवेळी झाड पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थितीही दिसून आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

14 जणांचा बुडून मृत्यू
गणपती विसर्जनावेळी वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे तीन जणांचा मृत्यू झाला तर देवळी येथे एकाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील सुपा आणि बेलवंडी येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला. पुण्यातील ग्रामीण भागातही बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली, यात धुळे, सातारा आणि सोलापूर शहरांचा समावेश आहे.

रस्ता अपघातात चौघे ठार
गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी बुडण्याबरोबरच काही लोकांचा रस्ता अपघातातही मृत्यू झाला. पोलीस म्हणाले की, महाराष्ट्रातील नागपूर शहरातील सक्करदरा परिसरात गणेश विसर्जनाच्या वेळी रस्ता अपघात झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला.

झाड पडल्याने महिलेचा मृत्यू
ठाण्यातील पावसात कोलबाड परिसरातील सार्वजनिक गणपती मंडपावर झाड कोसळले. या अपघातात 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच अन्य चार जण जखमी झाले आहेत. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, शुक्रवारी रात्री गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी आरती होत असताना मंडपावर मोठे झाड पडले.

11 जण जखमी
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे विसर्जनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून नऊ वर्षीय मुलीसह 11 जण जखमी झाले आहेत. वडघर कोळीवाडा येथे शुक्रवारी सायंकाळी वीज जनरेटरची केबल तुटल्याने ही घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या 11 जणांमध्ये चार मुलांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काहींना खासगी रुग्णालयात तर उर्वरितांना पनवेल येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये मारामारी

  • गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी राज्याच्या काही भागात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या घटनाही उघडकीस आल्या. अहमदनगर जिल्ह्यातील तोफखाना येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
  • जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत काही लोकांनी महापौरांच्या बंगल्यावर दगडफेक केली.
  • पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच चंद्रपूरमध्येही दोन गटांमध्ये हाणामारीच्या किरकोळ घटना घडल्या आहेत.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत