नवी दिल्ली : केंद्र सरकारने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज वितरित केले असून, महाराष्ट्र राज्याला कर परताव्यापोटी 7472 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या […]
टॅग: maharashtra
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर
मुंबई : देशभरातील विद्यार्थी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये (एबीसीआयडी) आपले खाते उघडत आहेत.आत्तापर्यंत देशातील १ हजार १६० शैक्षणिक संस्थांनी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये सहभाग घेतला आहे.यात राज्यातील ११० शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. देशात सक्रिय असलेली पहिले चारही राज्याचे विद्यापीठ यात आघाडीवर राहिले आहेत, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण […]
कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
नागपूर : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज […]
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018 आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त […]
४१ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र असणार ‘भागीदार राज्य’
‘वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल’ मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना नवी दिल्ली : ‘महाराष्ट्र दालन’ भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) साठी सज्ज होत आहे. यावर्षी महाराष्ट्राला ‘भागीदार राज्य’ होण्याचा मान मिळाला आहे. “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित यंदाचा व्यापार मेळा असणार आहे. या मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत […]
महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सुशील शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुशील शिंदे हे मुंबईच्या कांदिवली भागातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्याच्या […]
कोविड लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र सर्वप्रथम यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : कोविड लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र सर्वप्रथम असावा यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, असे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या कोविड लसीकरण अमृत महोत्सवात राज्यभरात ४४ लाख ८० हजार २९३ प्रिकॉशन डोसेस देण्यात आले असून १० लाख ६० हजार ४७७ दुसरा डोस आणि ४ लाख ७२ हजार ३६ असा पहिला […]
महाराष्ट्र हे आरोग्य पर्यटन क्षेत्रात पसंतीचे राज्य – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा
नवी दिल्ली : महाराष्ट्र दर्जेदार आणि समग्र आरोग्यसेवेचे प्रवेशद्वार आहे. भारताच्या आरोग्य पर्यटन बाजारपेठेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. राज्य आरोग्यसेवेच्या पर्यटन क्षेत्रात सतत चांगले बदल करीत असल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य आणि उपचारांसाठीचे एक पसंतीचे ठिकाण बनले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी धर्मशाला येथे आयोजित राष्ट्रीय पर्यटन परिषदेत केले. हिमाचल प्रदेशातील धर्मशालामध्ये केंद्रीय पर्यटन […]
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था
मुंबई : महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापना होत असून त्यामाध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण रोजगार, पर्यावरण या विषयावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रात सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी निती आयोगाने राज्याला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच देशाच्या पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन […]
हरित लवादाचा मोठा निर्णय, महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड…
नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला पर्यावरण विषयक नियमांचं पालन न केल्यानं तब्बल १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल यांनी राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम १५ नुसार पर्यावरणाची हानी झाल्यानं आणि घन आणि द्रवरुप कचरा व्यवस्थापनातील सुप्रीम कोर्टाच्या सूचनांचं पालन न केल्यानं हा दंड ठोठावण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादानं […]










