The second wave of corona in Maharashtra will completely subside in the first week of May
महाराष्ट्र

चिंता वाढली! महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आढळले कोरोनाचे 4024 नवीन रुग्ण, 2 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा चिंतेत भर टाकायला सुरुवात केली आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे 4024 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 3028 रुग्ण बरे झाले आहेत आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय प्रकरणे […]

Blood banks will be started in every taluka of the Maharashtra state
महाराष्ट्र

राज्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तपेढी सुरू करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आज राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन […]

Amit Deshmukh will follow up on allowances for nurses
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक

मुंबई : वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असून परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी […]

Monsoon will come in Maharashtra between 7 to 10 June 2022
महाराष्ट्र शेती

मान्सून आगमनाची तारीख बदलली; महाराष्ट्रात कधी दाखल होणार? जाणून घ्या…

मुंबई : केरळमध्ये १ जूनपर्यंत आणि महाराष्ट्रात ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास संथगतीने होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने आधी केरळमध्ये मान्सून २७ मे पर्यंत पोहोचणार असा अंदाज वर्तविला होता. पण वातावरणातील बदलांचा आढावा घेऊन हवामान विभागाने […]

Fisheries Minister Aslam Shaikh extends deadline for payment of lake contract till end of April
महाराष्ट्र मुंबई

मत्स्योत्पादनात महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनवणार, महामत्स्य अभियान कसे आहे? जाणून घ्या…

मुंबई : महाराष्ट्राला लाभलेला ७२० कि.मी. समुद्रकिनाऱ्याचा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा कल्पकतेने उपयोग करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या सहाय्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांना सोबत घेऊन राज्याला मत्स्योत्पादनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करुन देण्याचा निर्धार मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आज केला. मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘महामत्स्य अभियाना’चा […]

Nana Patole Letter To CM Uddhav Thackeray Over Obc Reservation
महाराष्ट्र मुंबई राजकारण

OBC आरक्षणासाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे या पत्रात […]

Election Commission Of India
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, डॉ. विकास महात्मे, […]

election
महाराष्ट्र मुंबई

निवडणूका 2022: राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुका होणार नाहीत

मुंबई : बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (निवडणूक 2022) महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. कोणतेही कारण न देता सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुका होणार […]

At least 25 died due to heatstroke in Maharashtra; highest in 6 years
महाराष्ट्र मुंबई

राज्यात किमान 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू, सहा वर्षांतील सर्वाधिक आकडेवारी

मुंबई : महाराष्ट्रात 2022 मध्ये आतापर्यंत किमान 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, जो सहा वर्षांतील सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. याआधी 2016 मध्ये उष्माघाताने 19 जणांचा मृत्यू झाला होता. 1 मे 2022 पर्यंत उष्माघाताची एकूण 381 प्रकरणे आरोग्य विभागाकडे नोंदवण्यात आली आहेत. उष्माघातामुळे सर्वाधिक 11 मृत्यू नागपुरात, त्याखालोखाल औरंगाबादमध्ये 5 आणि […]

BJP leader Ganesh Naik could be arrested at any time pre-arrest bail denied in both cases
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भाजप नेते गणेश नाईकांवर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई, दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नेरुळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्ह्यात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयानं गणेश […]