uddhav-thakrey
महाराष्ट्र

राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी तयार केली मार्गदर्शक तत्वे

राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आज मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे असून […]

NCP rohit pawar
महाराष्ट्र

जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा- रोहित पवार

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील आता जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्याची मागणी केली आहे. जिम, रेस्टॉरंट आणि क्लास चालक योग्य काळजी आणि दक्षता घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. ”कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत […]

The number of corona patients
कोरोना महाराष्ट्र

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा, कोरोना चाचण्या वाढवा अन्यथा..

महाराष्ट्रात वारंवार सांगूनही कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले जात नाही. यामुळे कोरोना रुग्ण आणि मृत्यू दोन्ही वाढतील हे लक्षात घ्या, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. जास्तीतजास्त चाचण्या वेळेत केल्यास रुग्णांचा लवकर शोध लागू शकतो तसेच त्याची जीवही वाचू शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्र […]

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत आम्ही सरकारसोबत आहोत – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली. त्यासंदर्भात पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले कि, “आम्ही सरकारसोबत आहोत, यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही.” “मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकार सध्या तीन पर्यायाने विचार करत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका […]

maharshtra CM Uddhav Thakarey
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं महाराष्ट्रातील जनतेला संबोधित, अनेक मुद्द्यांवर केलं भाष्य

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 1 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  . यावेळी त्यांनी कोरोना, मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. रेस्टॉरंट आणि मंदिरे टप्प्याटप्प्याने लवकरच सुरु करण्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले होते. येत्या तीन-चार दिवसात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच जिम-रेस्टॉरंट मालकांनी सूचना […]

Udayanraje Bhosale
महाराष्ट्र

सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं- खासदार उदयनराजे भोसले

‘मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्याचा परिणाम आज मराठा समाजाला भोगावा लागत आहे. आता सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उदयनराजे यांनीही फेसबुक पोस्टच्या […]

maha-vikas-aghadi
महाराष्ट्र

कंगना प्रकरणामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत तणाव

अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती आणण्यात आली आहे. मात्र महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. सुशांत सिंह प्रकरण हाताळण्यावरुन राज्य सरकारला टीकेला सामोरं जावं लागत आहे त्यातच आता कंगना प्रकरणामुळे महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं कळत आहे. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी […]

radhakrishn vikhe patil
महाराष्ट्र

कोरोनाचं अपयश झाकण्याकरिता राज्य सरकार घेतंय कंगनाचा आधार- आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर: कोरोनाचं अपयश झाकण्याकरिता राज्य सरकार हे कंगना राणावतचा आधार घेत आहे अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. कंगना रणावत हिने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कंगनावर सर्वच स्तरातून टीका होत आहेत. शिवसेनेनेदेखील कंगनावर आरोप केले तर कॉंग्रेसने थेट भाजपाच्या जे पोटात ते कंगनाच्या मुखात अशी प्रतिक्रिया दिली. कंगनाची चर्चा करण्यापेक्षा […]

railway started
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूकीला परवानगी

लॉकडाउन शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे. पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी […]

महाराष्ट्र राजकारण

तुम्ही जिम सुरु करा, बघू काय होतं- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

अनलॉकची प्रक्रिया सुरु असली तरी अद्याप जिम सुरु करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिलेली नाही, त्यामुळे सरकारकडे जिम पुन्हा सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली. राज ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं, तेही म्हणाले जिम सुरु झालं […]