मुंबई : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जात […]
टॅग: maharashtra government
शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी, खचून न जाता उमेदीने उभे राहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
औरंगाबाद : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याबाबत मदत म्हणून शासन पीक विमा वेळेत देण्याबाबत काम करत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या मदतीने नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पुर्ण करुन मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करावे, त्याचप्रमाणे या संकटात खचून गेलेल्यांना […]
महाराष्ट्रात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवे नियम जाहीर, जाणून घ्या
मुंबई : राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. परंतु, ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करण्यात येणार आहे. ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा […]
याचिकेत ‘ते’ विधान तुम्ही कसं केलं? न्यायालयाचा परमबीर सिंग यांना सवाल, 9 जूनला पुढील सुनावणी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना 9 जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी हमी देतानाच तोपर्यंत परमबीर सिंह यांना तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंतीही राज्य सरकारने आज (24 मे) मुंबई उच्च न्यायालयात केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील एका मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं परमबीर […]
परमबीर सिंह यांना सोमवारपर्यंत अटक करू नये, हायकोर्टाचा मध्यरात्रीच्या सुनावणीत राज्य सरकारला आदेश
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर सोमवार (२४ मे) पर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्री राज्य सरकारला दिला. उन्हाळी सुटीकालीन न्यायालय असूनही न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने शुक्रवारीही तब्बल १३ तास सलग न्यायालयीन कामकाज केले. त्यात रात्री दहाच्या सुमारास परमबीर यांच्या […]
ब्रेक द चेन : जाणून घ्या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे…
मुंबई : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. १. डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ? ४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी […]
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठीच्या गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी
मुंबई : शिवजयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी कोरोना संसर्गामुळे १९ फेब्रुवारी २०२१ रोजीचा ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठीच्या गाईडलाईन्स : अनेक […]
कृषी योजनांचा लाभ मिळण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत महा-डीबीटी पोर्टलवर करा अर्ज – कृषीमंत्री भुसे
मुंबई : सर्व कृषी योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज 31 डिसेंबर पर्यंत सादर करावेत. शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. […]
मंत्रिमंडळ निर्णय : दि. ९ डिसेंबर २०२० : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय
महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे. या बैठकीच्या […]
ब्रेकिंग : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तूर्तास नकार
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवण्यास तूर्तास नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवल्याने आता पुढील सुनावणी होईपर्यंत नोकरभरती, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत आरक्षण लागू करता येणार नाहीये. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने लावलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू […]










