मुंबई : सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने करत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. म्हाडाच्या कोकण मंडळाची ४ हजार ६४० सदनिकांची आणि १४ भूखंडांची संगणकीय लॉटरी काढण्यात […]
टॅग: Eknath Shinde
राज ठाकरेंच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ – देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी आवाहन करणारं पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन […]
शिवसेनेला मोठा धक्का! दोन दिवसांत नव्या चिन्हासाठी पर्याय सादर करा, निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय देऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही हे चिन्ह वापरता येणार नाहीये. त्यांना सोमवारपर्यंत नवीन […]
महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर, पहा कोण आहे तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास सव्वा महिन्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री असतील. बहुचर्चित औरंगाबादची जबाबदारी संदीपान भूमरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकरांना […]
उद्धव ठाकरे गटाला धक्का! अखेर नवरात्र उत्सवासाठी एकनाथ शिंदे गटाला परवानगी
कल्याण : कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आम्ही याबाबत कायदेशीर लढाई करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. […]
हरित लवादाचा मोठा निर्णय, महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड…
नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला पर्यावरण विषयक नियमांचं पालन न केल्यानं तब्बल १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल यांनी राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम १५ नुसार पर्यावरणाची हानी झाल्यानं आणि घन आणि द्रवरुप कचरा व्यवस्थापनातील सुप्रीम कोर्टाच्या सूचनांचं पालन न केल्यानं हा दंड ठोठावण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादानं […]
याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाचा वाद, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाच्या वादाच्या दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले की या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, “या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. याला जबाबदार […]
Sanjay Raut Arrested: संजय राऊत यांच्या अटकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले ते जाणून घ्या..
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना जमीन घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना ईडीने अटक केली असली तरी तपासानंतर सत्य बाहेर येईल, असे म्हटले आहे. पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय? पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची […]
शिवसेनेवर कोणाचा अधिकार? 8 ऑगस्टपर्यंत सिद्ध करा…निवडणूक आयोगाची सूचना
मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. दोन्ही नेत्यांना शिवसेनेवर अधिकार असल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडून ८ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. शिंदे गटाचा दावा […]
मंत्रिमंडळ निर्णय, १६ जुलै : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरताबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!
मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज […]










