मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे […]
टॅग: Chief Minister
मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी असा आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई मेट्रोच्या अंधेरी एल-सेव्हन स्थानक, अकुर्ली मेट्रो स्थानक, दहिसर रेल्वे उड्डाण पूल (मेट्रो रेल ब्रिज), चारकोप मेट्रो डेपो आणि डी.एन. नगर मेट्रो […]
दाजीपूर अभयारण्यात उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण कराव्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या अभयारण्यात निसर्ग पर्यटनास चालना मिळवून पर्यटकांचा ओघ वाढवा, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात; त्याचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दाजीपूर […]
सिने-नाट्य सृष्टीतील भारदस्त व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने “भारदस्तपणा” मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला आहे. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो नाहीतर महाभारतातील धृतराष्ट्र, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांत अक्षरशः प्राण ओतला. […]
शिवसेनेत प्रवेश करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन केला होता – उर्मिला मातोंडकर
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्ष प्रवेशाच्या निर्णयाबाबत खुलासा केला. ‘शिवसेनेत प्रवेश करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी अतिशय सुंदर गोष्ट सांगितली, ती म्हणजे ‘महाराष्ट्राची परंपरा इतकी मोठी आहे की त्यामुळं विधान परिषदेचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा अशी […]
महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग […]
नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप
भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुर मधील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना भाजप नेते नारायण राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. नारायण राणे यांनी त्याला प्रत्यूतर देताना पत्रकार परिषद घेत […]
नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सकाळी पोहोचले. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावक-यांना दिलासा दिला. बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगवी बुद्रूक या दोन्ही गावांना जोडणा-या पुलावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. जेथून मुख्यमंत्री दोन्ही गावांच्या […]
महाराष्ट्रात वादळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दौरा करावा- प्रकाश आंबेडकर
परतीच्या कोसळलेल्या पावसानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची मागणी केली आहे, त्याबरोबरच व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे. […]
मराठा आरक्षणासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करु, मुख्यमंत्र्यांचा निर्धार
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवड्यात स्थगिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. बैठकीनंतर बोलताना दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “आजच्या बैठकीत पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि त्याचसोबत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समाजातील तरुण, तरुणींना काय दिलासा द्यायचा हादेखील प्रश्न […]










