Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

बेघर आणि भिकाऱ्यांनी देशासाठी काहीतरी काम करावे, राज्य त्यांना सर्व काही मोफत देऊ शकत नाही- हायकोर्ट

मुंबई : रस्त्यावर राहणाऱ्या बेघर आणि भिकाऱ्यांवरती मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने शुक्रवारी जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान म्हटले की, बेघर आणि भिकाऱ्यांनीही देशासाठी काहीतरी काम केले पाहिजे. राज्यच त्यांना सर्व काही प्रदान करू शकत नाही. जर त्यांना विनामूल्य सर्व काही दिले तर ते काहीच […]

Mumbai High Court
देश

मुंबई उच्च न्यायालयाने गुलशन कुमार हत्याप्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली

मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी अब्दुल रौफ याची जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. कोर्टाने रौफला खून आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयाने रौफची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि हत्येनंतर बराच काळ फरार असल्याची दखल घेत जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये माफी मिळण्यास आरोपी पात्र […]

Doctor Have Lots Stress Due To Covid And Also Includes Harassment By Relatives Of Patients Says Bombay High Court
महाराष्ट्र मुंबई

डॉक्टरांना असा मानसिक त्रास होता कामा नये – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : ‘डॉक्टर कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात रात्रंदिवस काम करत आहेत. कित्येकांवर कामाचा प्रचंड ताण आहे. असे असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना स्पष्टीकरणही देत बसावे लागत असेल तर त्यांना असा मानसिक त्रास होता कामा नये’, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. डॉ. राजीव जोशी यांनी अॅड. नितीन देशपांडे यांच्यामार्फत कोरोनाविषयक याचिका तसेच […]

Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केला संताप

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज घरोघरी लसीकरणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकार व मुंबई महापालिकेला फटकारले आहे. घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न न्यायालयाने विचारला. त्याचबरोबर ‘महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली होती? राज्य सरकारनं की मुंबई महापालिकेनं?’ याबाबत न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले. अॅड. धृती कपाडिया […]

second wave of corona
कोरोना महाराष्ट्र मुंबई

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनुभव व धड्यांच्या आधारे सुयोग्य नियोजन करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘हे’ निर्देश

मुंबई : ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उपायांची अधिक प्रभावी कार्यवाही व्हावी आणि नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत, यादृष्टीने पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव व धड्यांच्या आधारावर सुयोग्य नियोजन आराखडा बनवण्यासाठी आणखी एक स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचा विचार करावा,’ असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले आहेत. कोरोनाविषयक जनहित याचिकांविषयीच्या सुनावणीनंतर न्या. अमजद […]

high court questions parambir singh
महाराष्ट्र मुंबई

याचिकेत ‘ते’ विधान तुम्ही कसं केलं? न्यायालयाचा परमबीर सिंग यांना सवाल, 9 जूनला पुढील सुनावणी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना 9 जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी हमी देतानाच तोपर्यंत परमबीर सिंह यांना तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंतीही राज्य सरकारने आज (24 मे) मुंबई उच्च न्यायालयात केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील एका मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं परमबीर […]

critical covid patients saved after oxygen
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास शासन जबाबदार, औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

औरंगाबाद : ऑक्सिजन नसल्यामुळे किंवा ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही, अशा परिस्थितीत जर रुग्णाचा मृत्यू झाला तर शासनास जबाबदार धरण्यात येईल, अशी दुरुस्ती ऑर्डर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी. यू. देबडवार यांनी केली आहे. खंडपीठाने 19 मेच्या आदेशात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न व औषध विभागाचे सचिव सौरभ विजय आणि […]

CBSE postpones Class 12 Board exams, cancels Class 10 Board exams
महाराष्ट्र शैक्षणिक

दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कार्यरत असलेल्या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बोर्ड या विविध बोर्डांमध्ये एकवाक्यता नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारही या परीक्षांच्या […]

Supreme Court grants bail to Arnav Goswami
महाराष्ट्र मुंबई

टीआरपी घोटाळा : अर्णव गोस्वामींना उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई : कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलवायचे झाल्यास आगाऊ तीन दिवसांची (सुट्यांचे दिवस वगळून) स्पष्ट नोटीस द्यावी. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करायची झाल्यास आगाऊ ७२ तासांची स्पष्ट नोटीस द्यावी, जेणेकरून त्यांना योग्य न्यायालयासमोर दाद मागता येईल, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे गोस्वामींना […]

adoptive parents
महाराष्ट्र

मुंबई उच्च न्यायालयाने जन्मदात्या आई वडिलांचा दावा केला नामंजूर, मुलाचा ताबा दत्तक आईवडिलांना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं मुलाच्या भवितव्याचा विचार करत त्याचा ताबा जन्मदात्या आई वडिलांपेक्षा त्याच्या दत्तक आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम असलेल्या आईवडिलांना देणे संयुक्तिक ठरेल, असं निरीक्षण नोंदवत अतिशय महत्वपूर्ण निकाल दिला. तसेच मुलाचा ताबा सख्या आई वडिलांना देण्यास नकार दिला, ज्यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या लहान बाळाला एका जोडप्याला दत्तक दिले होते. ते मूल सहा वर्ष […]