Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी ठाकरे सरकार विधानसभेत विधेयक मांडणार – अजित पवार

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारल्यानंतर आता राज्य सरकार यासंदर्भात नवा कायदा तयार करणार आहे. त्यासाठी विधानसभेत सोमवारी रितसर विधेयक मांडून मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षणासाठी राज्यात नव्या कायद्याची अंमलबजावणी होईल. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना माहिती दिली. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न […]

indian students taken hostage by ukraine forces says russia
देश

सरकार आपले काम करत आहे, पुतीन यांना युद्ध थांबवण्याच्या सूचना देऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा चालवले जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारला निर्देश द्यावे यासाठी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, भारत सरकार भारतीयांना […]

high court questions parambir singh
महाराष्ट्र मुंबई

परमबीर सिंह भारतातच, जीवाला धोका असल्याने ते समोर येत नाहीत, वकिलांची सर्वोच्च न्यायालयात माहिती

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. परमबीर सिंह भारतातच असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने यावेळी दिली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत परमबीर सिंह यांच्या वकिलाने सांगितले की, परमबीर सिंह भारतात असून ते नेपाळला […]

supreme court
देश

निर्वस्त्र न करता केलेला स्पर्श देखील लैंगिक अत्याचारच, सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला ‘तो’ वादग्रस्त निर्णय

नवी दिल्ली : स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि POCSO कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा निर्णय दिला. पॉक्सो कायद्यासंदर्भात नागपूर खंडपीठाच्या वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की लैंगिक छळाच्या प्रकरणात, त्वचेशी त्वचेच्या संपर्काशिवाय देखील POCSO कायदा लागू आहे. निर्वस्त्र न करता स्तनांना स्पर्श म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे असं म्हणत […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र

मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय! पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन मांडणार बाजू

मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली. मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालावर देखील आज चर्चा करण्यात आली. यासंदर्भात मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे […]

supreme court
देश

आरोपीला अटकपूर्व जामीन देताना न्यायालयाने बघावी गुन्ह्याची गंभीरता, सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपीला अटकपूर्व जामीन देताना न्यायालयाने गुन्ह्याची गंभीरता आणि विशिष्ट आरोप यासारख्या निकषांचा विचार केला पाहिजे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हत्येच्या दोन आरोपींना दिलेला अटकपूर्व जामीन आदेश रद्द करताना न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, उच्च न्यायालयाने हे ठरवायचे […]

man and woman attempt suicide outside supreme court gate
देश

सर्वोच्च न्यायालयाच्या गेटसमोर एक महिला आणि पुरुषाने स्वत:ला पेटवून घेतले, आत्महत्येचा प्रयत्न…

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या गेटसमोर स्वत:ला पेटवून घेत दोन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी गेट क्रमांक डी मधून आत जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, योग्य ओळखपत्राशिवाय आत जाण्यापासून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. त्यानंतर, या दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटजवळ स्वत:ला पेटवून […]

sc big order every corona deceased family will have to pay compensation
कोरोना देश

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांना द्यावी नुकसान भरपाई

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय देत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश दिले आहेत. मात्र, ही भरपाई किती असावी याचा निर्णय सरकारलाच घ्यायचा आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोविडशी संबंधित मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच जी प्रमाणपत्रे यापूर्वी दिली गेली आहेत ती दुरुस्त करण्यास […]

central government said in supreme court its not possible to give compensation of 4 lakhs rupees on each corona death
कोरोना देश

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ शकत नाही, केंद्र सरकारने केले स्पष्ट

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे जाब विचारला होता. त्यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन आपले उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की कोरोनामुळे बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई देता येणार नाही. प्रत्येक कोरोना संक्रमित रुग्णाच्या मृत्यूची भरपाई देणे, […]

supreme court rejects parambir singh plea over case transfer other states
महाराष्ट्र मुंबई

आणि तुम्ही म्हणता राज्यातील पोलिसांवर तुमचा विश्वास नाही; हे धक्कादायक, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना सुनावले

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत परमबीर सिंग यांना कठोर शब्दांत सुनावले आहे. माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी आपल्याविरोधात करण्यात येणारी […]