मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच ठाकरे सरकारने मराठा आरक्षणावरुन मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना १० टक्के EWS (economic weaker Sections) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असून याबद्दलचा आदेश जारी करण्यात आला […]
टॅग: सर्वोच्च न्यायालय
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त आरक्षण रद्द, राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय सुनावला आहे. त्याबाबत महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. याअगोदर, महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा परिषद कायद्याचा कलम १२ […]
‘लिव्ह इन रिलेशनशीप’ अस्वीकारार्ह, जोडप्याला सुरक्षा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
चंदीगड : पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या एका जोडप्याला सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. लिव्ह इन रिलेशनशीप नैतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह असल्याचं देखील उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. गुलजा कुमारी (19) आणि गुरविंदर सिंह (22) यांनी सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाकडे मदत मागितली होती. याचिकाकर्त्यांचे वकील जे एस ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण-तरुणी गेल्या […]
बिग ब्रेकिंग : मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय
नवी दिल्ली : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या घटनात्मकतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आरक्षण असंवैधानिक ठरवले आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ठरविलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज नाही. मराठा आरक्षण हे 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन आहे. मराठा आरक्षण देताना 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याला कोणताही वैध आधार नाही. आर्थिक आणि […]
केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन करा, पण त्याआधी…
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही सल्ले दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने लस खरेदी करण्यासंदर्भातील धोरणावर केंद्राने पुन्हा एकदा विचार करावा असंही म्हटलं आहे. नाहीतर हे संविधानातील कलम २१ चं उल्लंघन ठरेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. वृत्तानुसार, […]
सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे मागितले कोरोनासंदर्भात मुद्द्यांवर स्पष्टीकरण, दिली ‘ही’ तंबी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात कोरोना संकटादरम्यान दाखल करण्यात याचिकांवर सुनावणी पार पडली. या दरम्यान ऑक्सिजनची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी आणि केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव अशा अनेक मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देखील मागितले. न्यायालयानं यावेळी कोरोना लसींचे दर केंद्र सरकार आणि राज्य सरकारसाठी वेगवेगळे […]
देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती, सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून लक्ष घालत चिंता व्यक्त केली आहे. देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती उद्भवल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण, लॉकडाऊन आणि औषधांचा पुरवठा या चार मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं कि, या राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सरकारनं काय […]
सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाचे बहुतेक कर्मचारी आणि कारकून कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे 50 टक्के कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्व […]
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, दिला ‘हा’ सल्ला
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला. तसेच सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना तुम्ही याप्रकरणी हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करत त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितले आहे. परमबीर सिंह यांनी […]
महिलेला सासरी मारहाण झाल्यास तिच्या जखमांसाठी पतीच जबाबदार – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कि, सासरी महिलेला कुटुंबीयांकडून मारहाण झाली तर तिच्या जखमांसाठी तिचा पतीच जबाबदार असेल. गेल्या वर्षी जून महिन्यात एका महिलेनं लुधियाना पोलिसांत पती आणि सासरच्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. हुंड्याची मागणी पूर्ण करू न शकल्याने पती, सासरे आणि सासू यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप महिलेनं केला […]









