मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात साथरोग […]
टॅग: कोल्हापूर
महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, तर ‘या’ पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून रायगड आणि पुण्यासह राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, […]
हवामान खात्याकडून नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, पुढील काही तास महत्वाचे
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून आज मुंबईसह एकूण नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार […]
पुण्यासह ‘या’ पाच जिल्ह्यांत हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार, […]
संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
मुंबई : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे, त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड […]
सांगलीनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातही संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातही संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढणारी रूग्णसंख्या आणि प्राणवायू आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता पाहता आज सकाळी तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं कि, “जिल्ह्यामध्ये सद्धा ऑक्सिजनची गरज वाढत […]
पंढरपूर जवळ बोलेरोचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांच्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ही बोलेरो थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन महिला एक पुरूष आणि एक लहान मुल अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात […]
‘मर्डरला एक वर्ष पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी सुरू’ असं स्टेटस ठेवणाऱ्या आरोपीला पुन्हा अटक
कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असणाऱ्या आरोपीने आपल्या व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला ‘मर्डरला एक वर्ष पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी सुरू’ असा व्हिडीओ लावल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तातडीने पोलिसांनी दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपी आकाश संजय वासुदेव याला तात्काळ अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी दीपक कोळेकर नावाच्या तरुणाचा […]
दाजीपूर अभयारण्यात उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण कराव्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या अभयारण्यात निसर्ग पर्यटनास चालना मिळवून पर्यटकांचा ओघ वाढवा, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात; त्याचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दाजीपूर […]
भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचं निधन
प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. भानू अथय्या या ९१ वर्षांच्या होत्या. भानू अथय्या यांनी भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. भानू अथय्या यांचे पूर्ण नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्याय होते. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापुरात झाला होता. त्यांनी १९५६ साली सुपरहिट सिनेमा सीआयडी साठी […]









